ठाणे : स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने लुटणा-यांना टोळीच्या म्होरक्याला ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शोध पथकाकडून अटक करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये ठाणे शहरात स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने लुटणा-या टोळीकडून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी बैठकीमध्ये तपासाचे आदेश दिले होते. अशा प्रकारचा एक गुन्हा वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगाने ठाणे गुन्हे शाखेतील शोध पथकाकडून समांतर तपास सुरू केला. बातमीदारांच्या माहितीच्या आधारे तपास करून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.
मालमत्ता गुन्हे शाखा पथकातील पोलीस हवालदार प्रशांत भुर्के यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आणि अत्यंत कौशल्याने तांत्रिक तपास करून आरोपी हरून महादेव सागवेकर (54) हा सायन प्रतीक्षानगरात राहतो. या टोळीच्या म्होरक्याला ताब्यात घेऊन कार्यालयात आणले आणि त्याची कसून चौकशी केली असता त्याने वागळे पोलीसच्या हद्दीत गुन्हा केल्याची कबूली दिली. त्याला अटक करण्यात आली आहे.
पुढील तपासकामी रीतसर कारवाई करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कामगिरी ठाणे शहर पोलीस आयुक्त, सह-आयुक्त, अतिरिक्त आयुक्त डॉ. पंजाबराव उगले (गुन्हे), उपायुक्त शिवराज पाटील (गुन्हे), सहाय्यक आयुक्त अशोक राजपूत (शोध २ गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक आनंद रावराणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जाधव, पोलिस अंमलदार स्वप्निल प्रधान, राजेंद्र घोलप, अर्जुन करळे, संदीप भालेराव, प्रशांत भुर्के, राजाराम शेगर, रुपवंत शिंदे, किशोर भामरे, राजकुमार राठोड, नवनाथ कोरडे, सदन मुळे आणि महिला पोलीस अंमलदार आशा गोळे आणि गीताली पाटील यांनी केली आहे.