जिल्ह्यातील ५९ हजार मतदार घरबसल्या करणार मतदान
ठाणे : वृद्धत्व आणि अपंगत्व यामुळे बहुतांशी मतदारांना वाहनांची सोय करूनही या पूर्वी केंद्रात जाऊन मतदान करणे अशक्य होते. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता १२ डी हा फॉर्म भरला तर या मतदारांना घरबसल्या मतदान करता येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत ८५ वर्षांवरील आणि दिव्यांग मतदारांची संख्या ५९ हजार चार एवढी असून या सुविधेमुळे या मतदारांचे मतदान १०० टक्के होण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 40 टक्के अपंगत्व आणि 85 वर्षे वयावरील वृध्द यांच्याकरिता भारत निवडणूक आयोगामार्फत 12 D नमुना भरुन घरुनच मतदान करता येणार. मात्र ही बाब अनिवार्य नसून अधिकची सुविधा म्हणून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूक 2024 ची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे इच्छुक मतदारांनी १२ डी फॉर्म पाच दिवसांत भरून द्यायचे आहेत. त्यापैकी पात्र मतदारांना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देतील.
भिवंडी ग्रामीण मतदारसंघात 1050 पुरुष आणि 1531 महिला असे एकूण 2,581 मतदार आहेत. शहापूर मतदारसंघात 1508 पुरुष आणि 2003 महिला असे एकूण 3511 मतदार आहेत. भिवंडी पश्चिम मतदारसंघात 1162 पुरुष तर 1118 महिला असे एकूण 2280 मतदार आहेत. भिवंडी पूर्व मतदारसंघात 363 पुरुष तर 337 महिला असे एकूण 700 मतदार आहेत. कल्याण पश्चिम मतदारसंघात 2014 पुरुष आणि 1,623 महिला असे एकूण 3637 मतदार आहेत.
मुरबाड मतदारसंघात 2111 पुरुष तर 2285 महिला असे एकूण 4396 मतदार आहेत. अंबरनाथ मतदारसंघात 1645 पुरुष तर 1398 महिला असे एकूण 3043 मतदार आहेत. उल्हासनगर मतदारसंघात 1037 पुरुष तर 1049 महिला असे एकूण 2086 मतदार आहेत. कल्याण पूर्व मतदारसंघात 1066 पुरुष तर 964 महिला असे एकुण 2030 मतदार आहेत. डोंबिवली मतदारसंघात 2634 पुरुष तर 1934 महिला असे एकूण 4568 मतदार आहेत.
कल्याण ग्रामीण मतदारसंघात 1575 पुरुष तर 1272 महिला असे एकूण 2847 मतदार आहेत. मीरा-भाईंदर मतदारसंघात 2640 पुरुष तर 2410 महिला असे एकूण 5050 मतदार आहेत. ओवळा-माजिवडा मतदारसंघात 2164 पुरुष तर 1572 महिला असे एकूण 3736 मतदार आहेत. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात 1461 पुरुष तर 1265 महिला असे एकूण 2726 मतदार आहेत. ठाणे मतदारसंघात 2817 पुरुष तर 2450 महिला असे एकूण 5267 मतदार आहेत. मुंब्रा-कळवा मतदारसंघात 1999 पुरुष तर 1620 महिला असे एकूण 3619 मतदार आहेत.
ऐरोली मतदारसंघात 1343 पुरुष तर 1134 महिला असे एकूण 2477 मतदार आहेत. बेलापूर मतदारसंघात 2597 पुरुष तर 1853 महिला असे एकूण 4450 मतदार आहेत.
अशा प्रकारे ठाणे जिल्ह्यातील एकूण 18 विधानसभा मतदारसंघात 85 वर्ष व त्याहून अधिक वय असलेल्या पुरुष मतदारांची संख्या 31186, महिला मतदारांची संख्या 27819 अशा एकूण मतदारांची संख्या 59004 इतकी आहे, अशी माहिती ठाणे उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी दिली आहे.