झी मराठीची चर्चित मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत रोज नवीन ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळतायत. अक्षरा आणि भुवनेश्वरी मधलं नातं एक वेगळं वळण घेताना दिसणार आहे. अक्षराने पुनः शाळेत जायला सुरवात केली आहे हे भुवनेश्वरीला बिलकूल आवडलेलं नाही. अक्षराच्या शाळेच्या पहिल्या दिवशीच भुवनेश्वरी फुलपगारे सरांना फोन करुन सांगते की अक्षराला जर शाळेत घेतलंत तर तुमचा तो शाळेत शेवटचा दिवस असेल. अक्षरा भुवनेश्वरीचा हा डाव तिच्यावरच उलटवणार का? फुलपगारेसरांची नोकरी वाचणार का? भुवनेश्वरीला सतत होणारी तिची हार आता सहन होत नाहीये. तेव्हा ती अक्षराच्या बहिणीला म्हणजेच इराला आपल्या सोबत घेतेय. ह्याच बरोबर भुवनेश्वरी, चारुहासने जो भूतकाळ उलगडला त्यामध्ये तिची काय बाजू आहे हे स्वत:हून अक्षरासमोर व्यक्त करते. आता भुवनेश्वरीच हे सत्य खरं आहे की कोणतं नवीन नाटक? हे येणाऱ्या भागातच कळेल. तेव्हा पाहायला विसरू नका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ सोमवार ते शनिवार रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
मनोरंजन
शिवा म्हणजे शिवानी पाटील ! संघर्षनगर नावच्या वस्तीत राहणारी शिवा, वडिलांचं गॅरेज चालवते. शिवा अख्ख्या वस्तीला माहितेय, कारण तिचा बेधडक स्वभाव, अन्यायाला तोंड द्यायची तिची प्रवृत्ती आणि अडल्यानडल्याच्या मदतीला...
सुट्ट्या आपल्याला रिफ्रेश करतात, आपल्याला रिचार्ज करायला मदत करतात आज आपले टीव्ही मालिकांमधले कलाकार ही त्यांच्या हिवाळ्यातल्या सुट्टीच्या आठवणी ताज्या करतायत. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ची अक्षरा म्हणजे शिवानी रांगोळे, ” मला हिवाळ्यात लेह-लदाख आणि राजस्थान खूप...
२६ जानेवारी २०२४ सगळ्या भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे . भारत देश ७५ वा गणतंत्र दिवस साजरा करत आहे. आपल्या सर्वांच्या ह्या दिवसाच्या खूप आठवणी असतील आणि यात आपले कलाकार...
अप्पीला पोटात हालचाल जाणवते आणि त्यामुळे, अर्जुन एकदम घाबरुन जातो, तो घरातल्यान आवाज देतो आणि सगळे एकत्र जमा होतात. सर्वांना लवकरच अप्पीची डिलिवरी होणार असे वाटते म्हणून घरी आनंदाचं वातावरण आहे. घरच्यांना अनादी बघून मनीच्या डोक्यात नवीन प्लॅन शिजतोय. घरात चर्चा रंगलेय अप्पीला मुलगी होणार की मुलगा. दुसरीकडे अप्पीची डिलिव्हरी ज्या सरकारी हॉस्पिटल मध्ये होणार आहे त्या हॉस्पिटलचे डॉक्टर त्याच्या सोबतच्या डॉक्टरांना सावध करून काही दिवस हॉस्पिटल मधील त्यांच्या काळ्या व्यवहाराच्या गोष्टी लपवायला सांगतात. अप्पीची ज्या सरकारी हॉस्पिटलमध्ये डिलिवरीसाठी भरती होते त्या हॉस्पिटल मध्ये एकाच हार्ट मशीनअसल्याने आणि ते अप्पीला दिली गेल्याने एका मुलीच्या आईची परिस्थिती खालावली असल्याचे अप्पीला समजते. हॉस्पिटलमध्ये एकच हार्ट मशीन कशी, ह्याचा गायतोंडे कडून शोध घेते. तेव्हा तिला डॉक्टर आकाश, डॉक्टर साळुंखे आणि व्यवस्थापन विभागाचे अधिकारी ह्यांनी हॉस्पिटलच्या मशीन गायब केल्याचे समजते तेव्हा अप्पी ऐन डिलिवरी आधी ह्या सर्व दोषी लोकांना बडतर्फ करते. अप्पीच्या ह्या वागण्याने तर अप्पीच्या बाळाला धोका तर निर्माण होणार नाही? मनीच्या डोक्यात कोणता नवीन प्लॅन शिजतोय ? अप्पी–अर्जुनच्या बाळावर कोणते संकट येणार आहे.? या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी पाहायला विसरू नका ‘अप्पी आमची कलेक्टर‘ सोमवार ते शनिवार संध्या ७:०० वाजता फक्त झी मराठीवर.
ठरलं तर मग मालिकेचा विशेष भाग ठरलं तर मग मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. प्रेक्षकांच्या याच प्रेमापोटी मालिका गेल्या अनेक आठवड्यांपासून नंबर वन वर आहे. लवकरच प्रेक्षकांना अर्जुन-सायलीसोबत...