झी मराठीवर पारू आणि शिवा नंतर ‘नवरी मिळाले हिटलरला’ मधल्या अभिराम जहागीरदारने म्हणजेच राकेश बापट याने प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवले असतानाच, आता हिंदी मालिका आणि मराठी चित्रपटातला हँडसम चेहेरा ‘अक्षय म्हात्रे’ लवकरच ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ह्या नवीन मालिकेतून झी मराठीवर पदार्पण करणार आहे. ह्या मालिकेच्या निमित्ताने अक्षय म्हात्रे पुन्हा...
मनोरंजन
‘निवेदिता, माझी ताई!’ सोम. ते शुक्र. रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर! मालिका आणि प्रेक्षक यांचं अतूट नातं विणणारी लोकप्रिय वाहिनी म्हणजे सोनी मराठी. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मोठ्या दिमाखात सोनी मराठी एक नवी मालिका, ‘निवेदिता, माझी ताई!’ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आली....
झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हीज निर्मित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या चित्रपटातील गाणीही संगीतप्रेमींशी एक अनोखी...
अभिनेता अंकुश चौधरी सुपर जजच्या भूमिकेत, समृद्धी केळकर करणार सूत्रसंचालन तर फुलवा खामकर आणि वैभव घुगे कॅप्टनच्या भूमिकेत स्टार प्रवाहवर ९ मार्चपासून सुरू होत आहे धमाकेदार डान्स रिअॅलिटी शो ‘मी होणार...
प्रसाद जवादे टीव्ही मालिकांमधला लाडका चेहरा ‘पारू’ ह्या मालिकेतून पुन्हा एकदा झी मराठीवर पदार्पण करत आहे. तो आदित्य किर्लोस्करची भूमिका साकारत आहे. प्रसाद सोबत त्याच्या या नवीन मालिकेबद्दल आणि...
ते नीरजला माफ करतील की अजून एक नवीन युद्ध सुरु होईल ? ‘सारं काही तिच्यासाठी’ मध्ये निशी- नीरजच्या प्रेमाची परीक्षा सुरूच आहे. आता पर्यंत मुलींना नात्यात अग्निपरीक्षा देताना पहिले असेल पण ‘सारं काही तिच्यासाठी’ मध्ये नेहमीच काही तरी वेगळं बघायला मिळत. नीरजने काय नाही केलं निशीच्या वडिलांचा म्हणजे रघुनाथ खोतांचा विश्वास मिळवण्यासाठी, त्याच्या आणि निशीच्या नात्याला मंजुरी मिळवण्यासाठी. खोतांच्या घराबाहेर आपलं घर मांडलं, आणि आता तर चक्क आगीत जाऊन निशीला वाचवणार आहे उमाची साथ नीरजला पहिल्या पासूनच आहे पण रघुनाथच खोतांच मन जिंकणं इतकं सोपं नाही. नीरज आपल्या अपहरणाची बातमी ही लपवतो कारण हे सर्वानाच माहिती आहे की जर ही बातमी बाहेर पडली तर पहिला संशय रघुनाथ खोतांवरच येईल आणि नीरजला गोष्टी अजून चिघळलेल्या नको आहेत. पण उमाच्या मनात शंका आहे की नीरज काहीतरी लपवतोय आणि ती रघुनाथ खोतांसमोर हे व्यक्त करते, उमा अजून ही नीरजची बाजू घेतेय म्हणून तो संतापतो. पण शेवटी रघुनाथ खोतांसमोर नीरजच सत्य समोर येताच. नीरजचं कोणतं सत्य कळलंय रघुनाथला खोतांना ? ते नीरजला माफ करतील की अजून एक नवीन युद्ध सुरु होईल ? तेव्हा नीरज–निशीच्या नात्यासाठी बघायला विसरू नका ‘सारं काही तिच्यासाठी‘ संध्या ७:०० वा फक्त झी मराठीवर.