सुलेखा चव्हाण यांना सभागृहात पाठवणे हीच खरी श्रद्धांजली; शोकासभेत सर्वपक्षियांनी जागवल्या सुधाकर चव्हाण यांच्या आठवणी

ठाणे: २५ वर्ष ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेलेल्या सुधाकर चव्हाण यांच्या मागे खूप मोठा मित्र परिवार आहे. ठाण्यात शिवसेना अनेक वर्ष सत्तेत आहे त्यात सुधाकर चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. याचसाठी सुलेखा सुधाकर चव्हाण यांना पालिका सभागृहात पाठवणे हीच खरी सुधाकर चव्हाण यांना श्रद्धांजली ठरेल, अशी भावना सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी यांनी व्यक्त केली.

 

 

 

ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी शिवाईनगर येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खासदार राजन विचारे, माजी महापौर नरेश म्हस्के, भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, अशोक राऊळ, मनोज शिंदे, ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी नगरसेवक विक्रांत चव्हाण, अनिता गौरी, दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी, मनसेचे संदीप पाचंगे, वकील नंदकुमार राजूरकर, राजेश अथायडे, जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, कैलाश म्हापदी, राहुल लोंढे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.  यावेळी उपस्थित सुलेखा सुधाकर चव्हाण यांचे सांत्वन केले.