संभाजीराजेंचा राज्यसभेचा मार्ग मोकळा?

पुणे: छत्रपती संभाजीराजेंनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याचं जाहीर केल्यानंतर त्यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केल्याचा दावा संभाजीराजे यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. शिल्लक राहणारी मते सहाव्या जागेसाठी आम्ही छत्रपती संभाजीराजेंना देऊ असं शरद पवारांनी नांदेडमध्ये सांगिलतं होतं.

छत्रपती संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याकरिता संभाजीराजे यांना अर्ज दखल करण्यासाठी 10 अनुमोदक आमदारांची आणि निवडून येण्यासाठी एकूण 42 आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. याकरिता अनुमोदन देण्यासाठी संभाजीराजे यांनी अपक्ष आमदारांना साद घातली आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याच पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी ही जागा आपल्याला अपक्ष म्हणून देण्यात यावी, अशी जाहीर मागणी केलेली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेत भूमिका मांडताना छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीस महाविकास आघाडीकडून पाठिंबा व्यक्त केलेला आहे.