डोळ्यांची साथ आल्याने औषधांच्या मागणीत दुपटीने वाढ

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात मागील काही दिवसांपासून डोळे येण्याची साथ सुरू आहे. त्यामुळे डोळ्यांच्या औषधांची आणि ‘ड्रॉप’ची मागणी दुपटीने वाढली आहे. अचानक मागणी वाढल्याने शहरातील औषध पुरवठारांची विक्रेत्यांना औषध पुरवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

नवी मुंबई शहरात मागील दहा-बारा दिवसांपासून डोळे येण्याचे रुग्ण आढळून येत आहेत. मनपा रुग्णालयात रोज २५ ते ३० रुग्ण जरी येत असले तरी खाजगीत उपचार घेणाऱ्यांची संख्या शेकडोंनी आहे. डोळ्यांची साथ वाढल्याने औषध तसेच आय-ड्रॉप डोळ्यात टाकण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे एकाचवेळी या औषधाची आणि ड्रॉपची अचानक मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात विविध कंपन्यांच्या ‘आय ड्रॉप’चा सध्या तुटवडा जाणावत आहे. पूर्वीच्या तुलनेत औषधांच्या आणि ‘ड्रॉप’च्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे तुटवडा जाणत असल्याचे मत घाऊक औषध पुरवठादारांनी व्यक्त केले आहे.

मागील दहा-बारा दिवसांपासून डोळे येण्याच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे औषधांच्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे मात्र, गेल्या आठवड्यापासून कंपन्यांकडून ड्रॉपचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने तुटवडा निर्माण झाला आहे, अशी माहिती औषध पुरवठादार
राजेश गुप्ता आयांनी दिली.