तीन मोबाईल चोरीचा तपास करताना १८ मोबाईल चोऱ्या उघडकीस

नौपाडा पोलिसांनी अटक केली सराईत गुन्हेगाराला

ठाणे : बतावणी करुन मोबाईल चोरी करणा-या आणि दुकानांचे शटर उचकटून चोरी करणा-या सराईत आरोपींना अटक करण्यात ठाणे नौपाडा पोलिसांना यश आले आहे.

त्यांंना अटक करुन या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करुन  एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. तीन मोबाईल संचांच्या चोरीचा तपास करताना अन्य १८ मोबाईल चोरीचे गुन्हेही उघडकीस आले.

मुंबई मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरातील खंडोबा मंदिरासमोर इमारत क्र. १७ मध्ये राहतो. त्याने व साक्षीदार आशिष शर्मा याला एका अनोळखी व्यक्तीने फोन करुन कपड्याच्या दुकानात कामाला लावण्याचे आमिष दाखवले आणि त्याला नौपाड्यातील एमटीएनएल चौकात बोलावले. त्याचा विश्वास संपादन केला आणि ३५ हजार रुपये किंमतीचे तीन महागडे मोबाईल चोरुन त्याची फसवणूक केली.

नौपाडा पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यासाठी सीसीटीव्हीचे फुटेज तपासल्यानंतर मुंब्र्यातील मोहम्मद जलाल शेखची गठडी डोंबिवली परिसरातून उचलबांगडी केली. त्याला नौपाडा पोलीस ठाण्यात अटक केल्यानंतर त्याच्याकडून तब्बल दोन लाख ४० हजार रुपयांचे एकूण १८ अँड्रॉईड मोबाईल संच हस्तगत केले आहेत. आरोपीने हे गुन्हे करताना एकूण १२ वेगवेगळ्या कंपन्यांच्या सीमकार्डांचा वापर केल्याचे उघडकीस आले आहेत. त्याच्यावर मुंबईतील शिवाजीनगर आणि मरिन ड्राईव्ह पोलीस ठाणेसह नौपाडा पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल केले आहेत. आरोपीकडून हस्तगत केलेल्या मोबाईल फोनच्या आयएमईआय क्रमांकाची माहिती मिळाल्यानंतर आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सध्या त्याला पोलीस कोठडीत ठेवले आहे.

नौपाडा हद्दीतील मखमली तलावाजवळील पारस ऑटो सेंटरच्या दुकानाचे शटर २७ डिसेंबर रोजी रात्री ९  नंतर फोडले होते. शटरचे कुलूप तोडून एक लाख ५८ हजार रुपयांची चोरी केली होती. या प्रकरणी  गुन्हा दाखल झाल्यानंतर  नौपाडा पोलिसांनी संतोष कांबळे याला तांत्रिक माहितीच्या आधारे जळगाव पहुर येथून अटक केली आहे. तो सराईत गुन्हेगार आहे.

ही कामगिरी उपायुक्त गणेश गावडे, सहाय्यक आयुक्त सोनाली ढोले, वरिष्ठ निरीक्षक संजय धुमाळ, निरीक्षक आनंद निकम  (गुन्हे)यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गोसावी, उपनिरीक्षक लभडे , हवालदार पाटील, गायकवाड, चव्हाण, राठोड, रांजणे, कॉन्स्टेबल राठोड, येळवे, तिर्थकर, पोलीस नाईक समाधान माळी यांनी केली आहे.