जिल्ह्यात आज १२ हजार नागरिकांचे लसीकरण

ठाणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज रात्री नऊपर्यंत ठाणे जिल्ह्यातील सुमारे १२ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी २९ लाख १९ हजार ८४९ डोस देण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६८ लाख ५२ हजार ३१३ नागरिकांना तर ५९ लाख २२ हजार ४४४ नागरिकांना दुसरा डोस आणि १ लाख ४५ हजार ९२ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात २८९ लसीकरण केंद्रांवर लसीकरण आयोजित करण्यात आले.