पावसाने ठाण्याला झोडपले; पेरणीला सुरुवात; तलावही भरले

ठाणे : मागील दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने ठाणे शहरासह जिल्ह्याला झोडपून काढले असून ३२ तासात ठाण्यात दोनशे मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. या पावसाने शहरातील तलाव भरू लागले असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पेरणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान ठाणे शहरात अनेक झाडे उन्मळून पडली तर मुंब्रा बायपास रस्ताही खचला आहे.

काल सकाळपासून ठाण्यात पावसाला सुरुवात झाली होती. आज सकाळी ८.३० पर्यंत १४६.०२ मि.मी. पाऊस पडला होता तर आज संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ६०.५३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत ६५७.८७ मि.मी. पाऊस झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ११३१.८ मि.मी. पाऊस झाला होता.

जोरदार पावसामुळे शहराच्या विविध भागात झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. काल दहा ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या तर पाच झाडे पडली आज देखिल झाडे पडण्याच्या घटना घडल्या. दरम्यान मुंब्रा बायपास महामार्ग सम्राट अशोक नगर येथे खचल्याने धोकादायक ठरू लागले आहे. रस्त्यावर दरड कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीचे उपायुक्त मनिष जोशी, सहाय्यक आयुक्त सागर साळुंखे यांच्यासह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन योग्य ते नियोजन केले.

दरम्यान ठाणे शहरासह जिल्ह्यात देखिल मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे बळीराजा सुखावला असून भात आणि नाचणीच्या पेरणीला सुरुवात करण्यात आली आहे.

मुंबईसह संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पाच दिवस पाऊस

पुणे : मुसळधार कायम, अतिवृष्टीचा इशारा ; मुंबईसह संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पाच दिवस पाऊस

मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांत मुसळधार पाऊस कायम असून, पुढील पाच दिवसांत काही भागांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकणात काही भागांत चोवीस तासांत ३०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. कोकणात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई आणि ठाण्यातही जनजीवन विस्कळीत झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आदी भागांत जोरदार पाऊस होत आहे. विदर्भातही गेल्या चोवीस तासांत काही भागांत जोरदार सरी कोसळल्या. मराठवाड्यात मात्र पावसाचे प्रमाण अद्यापही कमी आहे.

अरबी समुद्रातून सध्या महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर बाष्प येत आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीचा भाग आणि त्यालगत थेट पश्चिम महाराष्ट्रापर्यंत मोठ्या प्रमाणातवर ढग निर्माण होत असल्याने दोन ते तीन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. दक्षिण कोकणात पावसाचा जोर सर्वाधिक आहे. त्यामुळे या भागात सर्वच नद्या धोक्याची पातळी ओलांडत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत होत असले, तरी काही भागांत तळ गाठलेल्या धरणांमध्ये पाणी जमा होऊ लागले आहे. त्याचप्रमाणे रखडलेल्या पेरण्या आता झपाट्याने मार्गी लागत आहेत.