अधिकृत ई-टॉयलेट पाडणे अधिकाऱ्यांना महागात पडणार

ठाणे: भाजप आमदाराच्या निधीतून बांधलेले व महापालिकेने मंजुरी दिलेले ई-टॉयलेट पाडल्याच्या प्रकाराची चौकशी करून कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज भाजपाच्या नेत्यांना दिले.

भाजपाचे आमदार संजय के ळकर आणि शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी जिल्हाधिकारी नार्वेकर व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची आज भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी महापालिके तील माजी गटनेते मनोहर डुंबरे, भरत चव्हाण, विकास पाटील, रोहिदास मुंडे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. ठाणे महापालिके तील सत्ताधाऱ्यांनी `टॉयलेटमुक्त दिवा’ साकारले. तेथे सार्वजनिक शौचालये नसल्यामुळे आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून ई-टॉयलेट बांधले जात होते. मात्र, आमदारांबरोबर चर्चा न करताच महापालिके च्या बेजबाबदार अधिकाऱ्यांनी महापालिके नेच मान्यता दिलेले ई-टॉयलेट पाडले, याकडे आमदार संजय के ळकर व आमदार डावखरे यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. पाडलेल्या ई-टॉयलेटसमोर उभ्या असलेल्या बेकायदा इमारतीच्या कामावर कारवाई का के ली नाही, असा सवाल आमदार के ळकर यांनी के ला. दिव्याबरोबरच शहराच्या विविध भागात एखाद्या टोळीप्रमाणे बेकायदा कामे सुरू आहेत. अनधिकृ त बांधकामांवर
कारवाईसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांकडूनच बेकायदा बांधकामांना पाठीशी घातले जात आहे. शहरातील १०० बेकायदा बांधकामांची यादी महापालिके ला दिली जाईल. त्यावर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून आं दोलन के ले जाईल, असा इशारा आमदार के ळकर व आमदार डावखरे यांनी दिला.

क्लस्टरच्या घोषणा के ल्या जात असून, एका ठिकाणीही अं मलबजावणी नाही. मात्र, क्रेडिट घेणारे बॅनर लावले जात आहेत. कोपरीतील नागरिकांवर जुलूम जबरदस्ती के ली जात आहे. महापालिका प्रशासनाने आधी किसननगरमधील क्लस्टर यशस्वी करून दाखवावे. त्यानंतर उर्वरित ठिकाणचे क्लस्टर हाती घ्यावे. अन्यथा, एसआरए प्रमाणेच हजारो कु टुंबे बेघर होण्याची भीती आहे, असे भाकित आमदार के ळकर यांनी के ले.

हुक्का पार्लरला महापालिके ने परवानगी दिली नसून, हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी दिले असल्याचे आमदार के ळकर यांनी सांगितले. कोपरी प्रसुतीगृहाबाहेर महिलेची प्रसूती झाल्याच्या घटनेकडे भाजपाच्या नेत्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. त्यानंतर त्या ठिकाणी गर्भवती महिलांना दिवसभरात के व्हाही दाखल करता येण्याच्या कार्यवाही करण्याच्या सुचना आयुक्तांनी दिल्या.