कोकण विभागातील सोळा हजार युवकांना मिळाले काम

* मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना
* तीन हजारांहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर

नवी मुंबई: महाराष्ट्र शासन उद्योग विभागाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या माध्यमातून तीन हजाराहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर झाले असून, यामधून सुमारे 16 हजाराहून अधिक युवांच्या हातांना काम मिळणार आहे.

या योजने अंतर्गत कोकण विभागातील चार जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयांनी 100टक्केपेक्षा अधिकची कामगिरी केली असून कोकण विभागाचे जिल्हा उद्योग केंद्र यंत्रणेचे 2760 प्रकरणांचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे.

चालू आर्थिक वर्षात कोकण विभागाकरिता 4600 प्रकरणांचे उद्दीष्ट दिले असून त्याअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र यंत्रणेला 2,760 प्रकरणांचे तर खादी व ग्रामोद्योग या यंत्रणेला 1,840 प्रकरणांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. या अंतर्गत कोकण विभागाने एकूण 3,273 कर्ज प्रकरणे मंजूर झाली असून यात 61 कोटी इतक्या अनुदान रकमेचा समावेश आहे. कोकण विभागाने पाचही जिल्ह्यांच्या जिल्हा उद्योग केंद्र यंत्रणेला देण्यात आलेले एकूण उद्दीष्ट सलग दुसऱ्यांदा 100 टक्केपेक्षा अधिक कामगिरी करुन पूर्ण केले आहे. विभागांतर्गतच्या रत्नागिरी जिल्हयाने जिल्हा उद्योग केंद्र यंत्रणेने- 151.46टक्के व खादी व ग्रामोद्योग यंत्रणेने 28.13टक्के उद्दीष्ट पुर्तता करुन जिल्हयाचे एकूण उद्दीष्ट 102.13टक्के नी पूर्ण केले आहे. जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग 125.83टक्के, पालघर-101टक्के कार्यालयानेही सलग दुसऱ्या वर्षी अत्यंत भरीव कामगिरी केली आहे. याशिवाय रायगड जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयोनेही 104.5टक्के प्रकरणे मंजूर करुन प्रथमत:च 100टक्के पेक्षा अधिकची कामगिरी करुन इतिहास रचला आहे. ठाणे जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाने 54.03टक्के कामगिरी करत कोकण विभागाच्या एकूण उद्दीष्टामध्ये सहभाग नोंदविला आहे. मंजूर प्रकरणांमध्ये 1008 घटक हे उत्पादन क्षेत्रातील असून 2,265 हे घटक सेवा क्षेत्रातील आहे. यात 50टक्के महिला व मागासवर्गीय उद्योग घटकांचा समावेश आहे. वरील कर्ज प्रकरणांमधून सुमारे 16 हजारांहून अधिक रोजगार निर्मिती होणार असून विभागातील रोजगार निर्मितीला मोठया प्रमाणावर चालना मिळणार आहे. याशिवाय रत्नागिरी जिल्हयांने 83.38टक्के मार्जिन मनी दावे सादर करुन महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या योजनेंतर्गत विभागामध्ये 100टक्केपेक्षा अधिकची लक्षांकपूर्ती करुन विभागीय उद्योग सह संचालक कार्यालय व रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या जिल्हयाने उल्लेखनिय कामगिरी केली आहे. कोकण विभागाने केलेली उल्लेखनिय कामगिरी विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी आणि विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्रसिंह कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाली. तसेच जिल्हाधिकारी रत्नागिरी एम.देवेंद्र सिंह, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग अनिल पाटील, जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे, जिल्हाधिकारी पालघर गोविंद बोडके, जिल्हाधिकारी ठाणे अशोक शिनगारे यांचे मार्गदर्शन व उत्तम सहकार्य लाभले आहे.