ठाणे : दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेम्भी नाक्यावर शेकडो कार्यकर्त्यांसह धुळवड साजरी केली. यावेळी भाजपचे आमदार संजय केळकर हे देखील या उत्सवात आवर्जून उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना रंग लावून धुळवड साजरी केली.
केल्याने लोकसभेच्या काही जागांवरून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष निर्माण झाला असताना धुळवडीच्या निमित्ताने ठाण्यात मात्र शिवसेना आणि भाजपचा एकच रंग पाहायला मिळाला. यावर्षी मात्र या उत्सवाकडे विरोधकांनी पाठ फ़िरवली.
लोकसभेच्या काही जागांवरून शिवसेना आणि भाजपचे अद्याप झालेले नसून विशेष करून नाशिक, ठाणे, कल्याण या तीन जागा दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. नाशिकची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी नाशिकचे आमदार हेमंत गोडसे यांनी धुळवडीच्या एक दिवस आधी होळीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आपल्या कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन केले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या धूळवडीमध्ये भाजपचे आमदार संजय केळकर यांनी उपस्थिती लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धूळवाडीच्या शुभेच्छा दिल्या.
दुसरीकडे विरोधकांनी मात्र धुळवड साजरी करत असताना कोणाचेही नाव न घेता सत्ताधाऱ्यांवर टीकेचे रंग उधळले.
काही लोकांनी भगवा रंग सोडलेला आहे, ज्यांनी भगवा रंग सोडलेला आहे, आणि जो रंग आता धारण केलेला आहे त्यांना त्याचा लखलाभ होऊ द्या, मात्र आम्ही भगवा रंग सोडलेला नाही असा टोला विरोधकांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी लगावला. ठाणे येथील निवासस्थानाबाहेर खा. शिंदे यांनी धुळवड साजरी केली. यावेळी पत्रकार बांधवांना तसेच सुरक्षारक्षकांना त्यांनी भगवा रंग लावला .
मला रंग बदलणारा सरडा व्हायचं नाही-जितेंद्र आव्हाड
माझ्या संकल्प एकच आहे कि मी आयुष्यात रंग बदलणार नाही, जो रंग ८० साली अंगावर घेतलाय तो रंग कधीच बदलणार नाही, मला रंग बदलणारा सरडा व्हायचं नाही, मी एक स्वच्छ रंग न बदलणारा माणुस आहे अशी टीका माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोणाचेही नाव न घेता केली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी जखमी दिलो का बदला चुकाने आये हे दिवाने दिवाने हे गाणं शेवटी म्हटलं
ठाण्यातील चंदनवाडी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या होळी उत्सवात ओमर अब्दुल्लांचे पोस्टर दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आयोजकांचा डाव उधळून लावला. जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याचा विरोध केल्याने अब्दुल्ला यांच्यावर सर्वत्र टीका होत असताना ठाण्यात देखील उमटले. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी ठाण्यात अनेक ठिकाणी त्यांचा निषेध केला. तर चंदनवाडी भागात होळीवर लावलेले ओमर अब्दुल्ला यांचे पोस्टरच पोलिसांनी जप्त केले. त्यामुळे संतापलेल्या आयोजकांनी कडक शब्दात निषेध नोंदवला आहे. ऐनवेळी नौपाडा पोलिसांनी हस्तक्षेप करत हे पोस्टर ताब्यात घेतले. महाराष्ट्र विरोधी भूमिका घेतल्याने आयोजक महेश कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नौपाडा पोलिसांना देखील धारेवर धरले.