दिव्यातील गतिमंद विद्यार्थिनी सेजल स्पेशल ऑलिंपिकमध्ये

डोंबिवली : पुढील महिन्यात जर्मनी येथे होणाऱ्या स्पेशल ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धेत भारतातील फुटबॉल संघात डोंबिवलीतील क्षितीज संचालित गतिमंद मुलांच्या शाळेतील १६ वर्षीय विद्यार्थिनी सेजल जेसवाल हिची निवड झाली आहे.

स्पर्धेत खेळताना संघातील इतर खेळाडूंबरोबर संघभावना राहावी म्हणून दोनदा झारखंड, एकदा कोल्हापूर आणि एकदा गुजरात येथे सरावाकरता गेली होती. दिव्यात राहणाऱ्या सेजलचे वडील रिक्षाचालक असून आई गृहिणी आहे. डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी येथील क्षिजित संचालित गतिमंद मुलांच्या शाळेत पूर्व प्राथमिक वर्गात शिकत आहे. २०१८ ला ठाण्यात पार पडलेल्या स्पेशल ऑलिंपिक कॅपमध्ये संस्थेच्या अध्यक्षा अनिता दळवी, दीपक साळुंखे यांसह शिक्षकांनी सेजला कॅम्पमध्ये घेऊन गेले असता तिची फुटबॉल खेळाची आवड व तीचा खेळ पाहून तिला संधी देण्याचे ठरविले. आधी तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय स्तरावर सेजलने अनेक पदके पटकाविली. आता सेजल पुढील महिन्यात होणाऱ्या जर्मनीला स्पेशल ऑलिंपिक स्पर्धेत खेळण्यासाठी जाणार आहे.