अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘ऍप’चा घेतला धसका

दिवसभर कार्यालय सोडले नाही

ठाणे : ठाणे महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी नवीन ऍपचा धसका घेतला असून कारवाईच्या भीतीने कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील टेबल दिवसभर सोडले नाही.

कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या ‘फिरती’वर ऍपचा वॉच हे वृत्त ‘ठाणेवैभव’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची चर्चा दिवसभर मुख्यालयात सुरू होती. आय स्कॅनिंग करून झाल्यानंतर बहुतेक कर्मचारी महापालिकेच्या महापालिकेच्या आवारात तसेच कँटीनमध्ये चहा पिऊन गप्पाटप्पा मारत असत, परंतु आज मात्र तुरळक कर्मचारी चहा-नाश्ता करण्यासाठी गेले होते, परंतु तेथे देखील ‘ठाणेवैभव’च्या बातमीची चर्चा सुरू होती.

महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कर्मचारी-अधिकारी यांना वेळेवर कामावर येण्याचे आणि आवाहन केले होते. जे कर्मचारी उशिरा येतील त्यांच्या विरोधात कारवाईचे हत्यार उपसले होते, त्यामुळे महापालिकेत शिस्त आणि वेळेवर कामाला येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे.

अधिकारी वर्गातील अभियंता प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील अधिकाऱ्यांना आय स्कॅन बंधनकारक नाही, त्यामुळे त्यांना ट्रेकिंग ऍप दिला जाणार असून त्याद्वारे त्यांच्यावर नजर ठेवली जाणार आहे.