बदलापूर : बदलापुरात एका २८ वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्रसाद जिंजुरके असे यातील मृत तरुणाचे नाव असून तो बदलापूर लगतच्या सापेगाव मधील पोद्दार एव्हरग्रीन सोसायटीमध्ये राहत होता.
आज सकाळी ज्यूवेलीकडून चामटोलीकडे जाणाऱ्या पुलाच्या बाजूला प्रसाद याचा मृतदेह आढळून आला. डोक्यात दगड घालून त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे.याबाबत माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बदलापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. रविवारी रात्री हा प्रकार झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला वेगाने सुरुवात केली आहे.याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.