ठाणे : अखिल भारतीय पासी विकास मंडळ ठाणे शाखेतर्फे ठाणे शहर व ग्रामीण परिसरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
अखिल भारतीय पासी विकास मंडळ ठाणे शाखेतर्फे कळवा येथील शिवाजी हॉस्पिटल येथे सिद्धेश अभंगे फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष सिद्धेश अभंगे यांच्या वाढदिवसानिमित्त गर्भवती महिला व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना ताज्या फळांचे वाटप करण्यात आले.
यावेळी अजय पासी, लालचंद्र पासी, माजी अध्यक्ष चंदन पासी व रमेश पासी, अधिवक्ता अतुल सरोज, अधिवक्ता राकेश सरोज, जीएस पासी, बच्ची भाई गुप्ता आदी उपस्थित होते.