दुबईत अंबरनाथ नगरपरिषदेचा झेंडा
अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषदेचे कर्मचारी शैलेश साळुंखे यांनी भारोत्तोलन म्हणजे पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले आहे.
दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या 98 किलो वजनी गटात स्कॉड्स, बेंच प्रेस, पॉवर लिफ्टिंगमध्ये शैलेश साळुंखे प्रथम पारितोषिक पटकावले आहे. शैलेश साळुंखे हे गेली 30 वर्षे अंबरनाथ नगरपालिकेमध्ये नोकरी करत असताना साळुंखे यांनी त्यांच्यातील कलागुणांना प्राधान्य दिले.
आता पटकावलेल्या पारितोषिकामुळे साळुंखे यांना मिनी ऑलिम्पिक खेळण्याची संधी मिळाली आहे.
साळुंखे यांच्या यशाबद्दल मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी त्यांचे नगरपरिषदेच्या वतीने कौतुक केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या. कर अधिक्षक नरेंद्र संख्ये आणि माहिती जनसंपर्क अधिकारी किमया पवार आदी यावेळी उपस्थित होते.