डिजिटल मीडिया ‘मेटा’कुटीला?

आधुनिक युगात जगाला एकसंघ ठेवण्याचे काम कोणी के ले असेल तर डिजिटल मीडियाने. माहितीचे वेगवान प्रसारण आणि त्यातून होणार संवाद समाज आणि अर्थकारणावर परिणाम साधत आहे. मानवजातीच्या संक्रमणात डिजिटल मीडियाचे योगदान लक्षणीय असून सारे जग केवळ मुठीत आले नसून तर ते घराघरात पोहोचले आहे. वैश्विक खेड्याच्या संकल्पनेस या मीडियानेमूर्त रूप दिले आहे. अशा मीडियातील लोकप्रिय व्यासपीठ अर्थातच फे सबुक, इन्स्टाग्राम आहे. कोट्यवधी ग्राहक भले या दोन माध्यमांचा उपयोग करत असले तरी ती चालवणे यथावकाश ‘मेटा’ला शक्य होणार नाही. कोव्हीड काळात या माध्यमाने जितकी उपयुक्तता सिद्ध झाली त्यामानाने त्यांना अपेक्षित लाभांश मिळाला नाही. मेटा कं पनीचे कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग घटणाऱ्या उत्पन्नामुळे व्यथित वगैरे झाले नसले तरी हा प्रतिसाद कमी होत गेला तर त्यांना ‘टिकटॉक’ समोर उभे राहणे कठीण होऊन बसेल. या माध्यमांचा उपभोग घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी जाहिरातदार खिशात हात घालून या माध्यमांचा वापर करताना दिसत नाहीत. कोव्हीड काळात उत्पन्न घटल्यामुळे साहजिकच गुगल परिवारात चिंतेचे वातावरण पसरू शकते. डिजिटल माध्यमांचे अर्थकारण त्या क्षेत्रातील विशेष लक्षणासारखे आभासी असू शकते. कोट्यवधी डॉलरची गुंतवणूक के ल्यावर त्यावर किमान
परतावा मिळेल अशी अपेक्षा व्यावसायिकांनी ठेवली तर चुकीचे नाही. अर्थात ही भारतीय गुंतवणूकदारांची विचारधारा परदेशात चालतेच असे नाही. त्यामुळे स्वतःची विमाने आणि समुद्रात बेटांची मालकी असणारे उद्योगपती अचानक एके दिवशी कफल्लक होऊन दिवाळखोरीचे बालंट ओढावून घेतल्याचे आपण अधून-मधून ऐकत असतो. झुकरबर्गचेअसे होण्याची सुतराम शक्यता नाही. परंतु डिजिटल मीडियाचा ग्राहकांना उबग आला तर त्यांचा प्रवास धोक्यात येऊ शकतो. सर्वसामान्यपणे डिजिटल माध्यमांचावापर तरुणाई करत असते. त्यांच्या जगण्यातला तो अविभाज्य भाग बनला आहे. परंतु या वर्गात जाहिरातदारांना स्वारस्य नसावे. किं वा या
वर्गाला आवडतील अशा उत्पादनांच्या जाहिरातीच दिसत राहणार. डिजिटलचा वापर चाळिशीनंतरचे ग्राहक प्रामुख्याने करतात तो कामासाठी. इथे मनोरंजन मूल्याचा विचारही होत नसतो. जिथे मनोरंजन नाही तिथे जाहिरातदारही आखडता हात घेतो. इंटरनेटचे जाळे पसरत चालले असताना त्यावरील माध्यमांना स्पर्धात्मक वातावरणात आपले अस्तित्व टिकवावे लागत आहे. त्यासाठी उत्तम कं टेंट (मजकू र) देण्याकडे माध्यमसंचालकांची धडपड असते. त्यासाठी गुंतवणूक करावी लागते ती वेगळीच. थोडक्यात स्पर्धेत टिकू न राहण्यासाठी खर्चवाढत जातो, परंतु तोंडमिळवणी होणे तितके च महत्वाचे आहे. सध्यातरी फे सबुकच्या तोंडाला फे स यायला सुरुवात झाली आहे. उत्पन्न असेच घटत राहिले तर फे सबुक, इन्स्टाग्राम चालवणारी ‘मेटा’ कं पनी ‘मेटा’कु टीला येऊ शकते!