चिंताजनक अपवादात्मकता

विकृ तीला सीमा नसते, असेच राजधानी दिल्लीत घडलेल्या या घटनेवरुन दिसते. आधी प्रेम, मग लिव्ह इन रिलेशनशिप असा हा या प्रेमी (?) युगुलाचा प्रवास अमानुष हत्येत आणि त्याहून किळसवाण्या अशा गुन्हा लपवण्याच्या प्रकारात संपला. प्रेम या शब्दावरील विश्वास उडावा अशी अं गावर काटे आणणारी घटना मती सुन्न करुन जाते. आपली तरुणपिढी, अपवादात्मक का होईना कोणत्या दिशेने चालली आहे, भारतीय समाजजीवनातील संस्कार आणि मूल्ये यांची किती भयंकर प्रकारे शक्ले उडत आहेत हेच या धक्कादायक प्रकारातून जगापुढे आले आहे. कॉलसेंटरमध्ये नोकरी करणारा आफताब आमिन पुनावाला याचे वसईजवळील माणिकपूर भागात राहणाऱ्या श्रद्धा वालकरशी प्रेमसंबंध होते. श्रद्धाच्या कु टुंबाला त्यांचे हे आं तरधर्मीय संबंध मान्य नव्हते. परंतु प्रेम आं धळे असते आणि श्रध्दाने घरच्यांचा विरोध झुगारून आफताबशी संबंध ठेवले. अखेर तिच्या कु टुबिं यांची भीती खरी ठरली. कॉलसेंटरमध्ये नोकरी करुन हातात नको तितका आणि आकस्मिकरित्या आलेल्या पैशांची नशा चढलेला एक मोठा तरूणवर्ग या देशात आहे. जिथे रात्र दिवस असतो आणि दिवसा रात्र, तिथे अनैसर्गिक जीवनशैली या तरुणाईचा ताबा न मिळवते तरच नवल! त्यामुळे
अनेक जण अं मली पदार्थांच्या आहारी जात असल्याचे लक्षात येऊ लागले आहे. पैसे हे उधळण्यासाठीच असतात यावर ठाम विश्वास ठेवायला लावणारी जीवनशैली आत्मसात करणारे तरुण मुळचे मध्यम आणि कनिष्ठ मध्यमवर्गातली मुले-मुली कालांतराने श्रीमंतांना लाजवतील अशी उधळपट्टी करु लागतात. त्यांचे त्यांच्या वास्तवाशी नाते तुटते आणि ते त्या दसऱ्ु या, खोट्या आणि भयाण अशा मायावी जगाचे नागरिक कसे आणि कधी होतात हेही त्यांना कळत नाही. आफताबसारखे विकृ त आणि श्रध्दासारख्या नवख्या तरुणांची संख्या या जगात कमी नाही. त्यांचे नियम, जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन, पैशांचे मोल, आनंदाची व्याख्या अशा अनेक बाबी वास्तववादी
जगापेक्षा निराळ्या आहेत. आपल्या कल्पनेबाहेरच्या आहेत. त्यामुळे अशा पाशवी घटनांमुळे आपलेच आतून तुकडे-तुकडे होत असतात. परंतु वासना, पैसा, अनैतिकता, राक्षसी महत्वाकांक्षा वगैरे यावर निस्सिम श्रध्दा असणारे असे गुन् करण् हे यासाठी धीट होत जातात. त्यांच्या मेंदवू र कामाच्या अनैसर्गिक वेळापत्रकाचा परिणाम असू शकतो. हे जरी त्याचे वैद्यकीय कारण झाले तरी ही भारत-भूमी अशा विकृ तीला पोषक व्हावी, याची अधिक चिंता वाटते. या प्रकरणातील मुलगी परिणामांबद्दल अनभिज्ञ असेलही, परंतु त्याची चेतावनी तिच्या घरच्यांनी तिला वेळीच दिली होती, हे नाकारुन चालणार नाही. वास्तववादी जगाचे शहाणपण या मोहाच्या दनिु येत तोकडे पडले हेच खरे!