कोळसेवाडी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलिसांनी मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून मोटार सायकलसह चोराला अटक केली आहे.

कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडणारे वाहन चोरी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे यांच्या सुचनेप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कोळशेवाडी पो.स्टे. मध्ये दाखल गुन्हयातील चोरीस गेलेल्या टिव्हीएस कंपनीची एन्ट्रॉक स्कूटी व अज्ञात आरोपीचा तपास सुरू केला होता.

गुप्त बातमीदारामार्फत माहीती प्राप्त करून रेकॉर्डवरील आरोपी पियुष जाधव (२०) रा. काटेमानीवली नाका, कल्याण पूर्व याला मंगळवारी लोकग्राम सर्कल, कल्याण पूर्व येथे ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरी केलेली ८० हजार रुपये किमतीची टिव्हीएस कंपनीची एन्ट्रॉक स्कूटी हस्तगत करण्यात आली आहे.

त्याला गुन्हयाच्या तपासाकामी ताब्यात घेऊन अटक केली आहे. ही कारवाई पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे, सहायक पोलिस निरीक्षक दर्शन पाटील, पोलीस हवालदार मिलींद बोरसे, राजेश कापडी, भागवत सौंदाणे, भगवान सांगळे, विलास जरग, नरेश दळवी, पोलीस शिपाई दिलीप सोनावळे, प्रदिप गिते यांनी केली आहे.