लोकमान्यनगरमध्ये चारही प्रभागात महिला राज
ठाणे : ठाणे महापालिकेच्या आरक्षण सोडतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुहास देसाई यांना लॉटरी लागली असून लोकमान्य नगर परिसरातील सलग चार प्रभागांमध्ये आठ-आठ जागा महिलांना राखीव झाल्याने पुरुषांना इतर प्रभाग शोधावे लागणार आहेत.
महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांची आरक्षण सोडत आज डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडली राबोडी येथील प्रभाग क्रमांक १८ येथे पूर्वी दोन प्रभाग महिलांकरिता राखीव होते. आज काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये येथे दोन जागा सर्वसाधारण गटाला राखीव आणि एक जागा महिलेकरिता आरक्षित झाली आहे. लोकमान्यनगर येथील प्रभाग क्रमांक ११,१२,१३,१४ आणि १५ या चार प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन जागा महिलांना आरक्षित झाल्या आहेत. माजी विरोधी पक्षनेते शानु पठाण यांच्या प्रभाग क्रमांक ३८मधील दोन जागा महिलांना आरक्षित झाल्याने राष्ट्रवादीमध्ये पुरुषांच्या एका जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक दोन येथे जैसे थे परिस्थिती राहिल्याने भाजपचे मनोहर डुंबरे यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्या प्रभाग क्रमांक २१मध्ये दोन जागा महिलांना आरक्षित झाल्या आहेत.
ठाणे महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक २२ मध्ये दोन जागा महिलांकरिता आरक्षित झाल्या आहेत तर अनुसूचित जातीच्या महिला आणि पुरुष यांच्यासाठी प्रत्येकी पाच जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत तर तीन जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असून त्यापैकी दोन जागांवर महिला आरक्षण या पूर्वीच पडले आहे.
१५ जागा ओबीसीकरिता राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी आठ जागा महिलांना आरक्षित झाल्या आहेत. महापालिकेत १४२ जागांकरिता चारचा एक आणि तीन सदस्यांचे ४६ असे ४७ प्रभाग तयार करण्यात आले होते.
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ करीता जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या १८,४१,४८८ इतकी असून, त्यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या १,२६,००३, अनुसूचित जमाती ४२,६९८ इतकी, नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केल्यानुसार एकूण १४२ जागांच्या १०.४ टक्केवारीनुसार एकूण १५ जागा निश्चित करुन देण्यात आलेल्या आहेत.
चौकट
* नागरिकांचा मागास प्रवर्ग – ७ जागा
१६ अ, १७ अ, २० अ, २६ अ, २८ अ, ३२ अ, ४७ अ
* नागरिकांचा मागास (महिला) – ८ जागा: २ अ, ४ अ, ७ अ, १४ अ, १९ अ, ४२ अ, ४३ अ, ४६ अ
सर्वसाधारण महिला जागा – ५६
प्रभाग १ अ, 1ब, २ ब, 4 ब, 5 ब, 6 ब, 7 ब, 8अ, 8ब, 9 अ, 9 ब, 10 ब, 11 अ, 11 ब, 12 ब, 13 अ, १३ ब, 14 ब, 15 ब, 16 ब, 17 ब, 18 अ, 20 ब, 21 अ, 21 ब, 22 अ, 22 ब, 24 ब, 25 अ, 25 ब, 26 ब, 27 ब, 28 ब, 30 अ, 31 अ, 31 ब, 32 ब, 33 अ, 34 ब, 35 अ, 35 ब, 36 अ, 37 अ, 38 अ, 38 ब, 39 अ, 40 अ, 40 ब, 41 अ, 41 ब, 42 ब, 43 ब, 45 अ, 45 ब, 46 आणि ४७ ब
ठाणे महापालिका एकूण जागा – १४२
* सर्वसाधारण खुला प्रवर्ग – ५८
* सर्वसाधारण खुला (महिला) – ५६
* नागरिकांचा मागास प्रवर्ग – ७
* नागरिकांचा मागास (महिला) – ८
* अनुसुचित जाती – ५
* अनुसुचित जाती (महिला) – ५
* अनुसुचित जमाती – १
* अनुसुचित जमाती (महिला) – २