आईकडून मुलांना मिळणारं ज्ञान आणि संस्कार आयुष्याच्या जडणघडणीत पुरून उरत असतात. अशाच आई आणि मुलाची समाजाप्रती एक संघर्षमय कथा ‘न्याय रक्षक’ या कन्नड चित्रपटात दडून आहे. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर चित्रपटाच्या मराठी...
मनोरंजन
द बायोस्कोप फिल्म्सने महान बंडखोर कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या बायोपिकच्या निर्मितीचे अधिकार त्यांच्या कुटुंबाकडून अधिकृतपणे घेतले असून दोन वर्षांच्या अत्यंत...
‘पारू’ ची निरागस अदा सगळ्यांच्या मनात कोरली गेली आहे. मग तिचं ते गोड हसणं किंवा नि:स्वार्थपणे लोकांची काळजी घेणं असो. ‘पारू’ ची भूमिका साकारणारी शरयू सोनावणे ने सांगितली पारूच्या...
स्टार प्रवाहवर १८ मार्चपासून सुरु होणाऱ्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोना भरभरुन प्रतिसाद मिळत असून मुख्य नायिका जानकीसोबत प्रोमोत दिसणारी छोटी मुलगी कोण आहे...
मालिका आणि प्रेक्षक यांचं अतूट नातं विणणारी लोकप्रिय वाहिनी म्हणजे सोनी मराठी. नेहमी विविध विषय प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येते आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आशय आणि विषय यांनी समृद्ध असणार्या मालिकांची परंपरा जपणाऱ्या सोनी मराठी वाहिनीवर नात्यांची सुरेख गुंफण बांधलेली नेहमीच पाहायला मिळते. फेब्रुवारी महिना हा सगळ्यांसाठीच खास असतो. सगळीकडे प्रेमाचे वातावरण बहरलेले असते. वेलेंटाईन डे जवळ आला की प्रेमाचे गुलाबी वातावरण सगळीकडे निर्माण होते. मालिकांमधील निरनिराळ्या जोड्यांमध्येदेखील प्रेमाची कबुली वेलेंटाईन डेनिमित्त दिली जाईल का, हे पाहणे प्रेक्षकांसाठी खास असेल. ते अनुसरूनच सोनी मराठीवरील मालिकांमध्ये प्रेमाची कबुली दिली जाणार आहे. ‘तुजं माजं सपान’ मालिकेत प्राजक्ता आपले स्वप्न पूर्ण करण्याकरता धडपड करत आहे. तिला कुस्ती अकादमी सुरू करायची आहे आणि आता वीरू तिला यासाठी मदत करणार आहे, तिला पाठिंबा देणार आहे. एकंदर त्यांच्यात जवळीक निर्माण होणार आहे. ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेत राजवीर आणि मयूरी यांच्यात दिवसेंदिवस प्रेमाचे रंग बहरणार आहेत. पण त्यात आता जोजोच्या येण्याने मयूरीच्या मनात असलेले प्रेम ती राजवीरसमोर काबूल करणार का, हे पाहायला मिळेल. वेलेंटाईन डेनिमित्त राजवीर आणि मयूरी हे चक्क कोळीवाड्यात विशेष नाचताना दिसणार आहेत. प्रेक्षकांना ही विशेष पर्वणी असेल. आता मयूरी प्रेमाची कबुली देणार का, हे मालिकेतच पाहायला मिळेल. ‘राणी मी होणार’ मालिकेत मीरा आणि मल्हार यांचे लग्न झाले असूनदेखील आपल्या अस्तित्वासाठी लढणारे मीरा आणि मल्हार यांच्यातदेखील प्रेमाचे रंग बहरणार आहेत. मीरा आपल्या मनातल्या गोष्टी मल्हारला सांगणार असून आपल्या प्रेमाची कबुली ती मल्हारला देणार आहे. त्यामुळे मीरा आणि मल्हार यांच्यात जवळीक निर्माण होताना प्रेक्षकांना दिसेल. ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ मालिकेत बयोच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो आहे. डॉक्टर होण्याच्या या प्रवासात तिला अनेक जणांचा पाठिंबा आहे, तर अनेक जण तिच्या स्वप्नाच्या आड येत आहेत. डॉक्टर विशालदेखील तिला उत्तम सपोर्ट करत आहे. पण इराला ते बघवत नाही कारण तीदेखील डॉक्टर विशालच्या प्रेमात असून ती वेलेंटाईन डेनिमित्त विशालला आपल्या मनातील सांगण्याची तयारी करते. पण काही करणामुळे इरा पोहचू शकत नाही आणि बयो तिच्याऐवजी जाणार आहे. त्यामुळे बयो आणि विशाल यांच्यात काही विशेष घडणार का, हे पाहायला मिळेल. एकंदर सोनी मराठी वाहिनी या वेलेंटाईन डेनिमित्त प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी विशेष असे मालिकांचे भाग घेऊन येत आहे. पाहायला विसरू नका वेलेंटाईन डे विशेष ‘तुज माजं सपान’, ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’, ‘राणी मी होणार’ आणि ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ मालिकांमधील वसंत ऋतूचा बहर फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.
लवकरच चित्रीकरणाला होणार सुरुवात मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचे नाव आघाडीवर आहे. आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे. आता...