भिवंडी : तालुक्यातील सावद ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत सावदचे सरपंच, उपसरपंच आणि चार सदस्यांनी उद्धव ठाकरे गटामधून भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
मोदी@ ९ अंतर्गत सावद येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सावद येथील सरपंच ज्ञानेश्वर चंद्रकांत म्हात्रे, उपसरपंच रामदास दळवी यांच्याबरोबर ग्रामपंचायतीचे चार सदस्य आणि २०० कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
या वेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भरत पाटील, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोरे, दयानंद पाटील, रामनाथ पाटील, जितेंद्र डाकी, निलेश गुरव, श्रीधर पाटील, राजेंद्र भोईर, श्रीकांत गायकर आदींची उपस्थिती होती.