48व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल मैदानावर गुरुवारी सुशांत कदमच्या दमदार शतकाच्या जोरावर बिनिट कम्युनिकेशनचा डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिस (बी) वर 115 धावांनी विजय झाला.
प्रथम फलंदाजी करताना बिनिट कम्युनिकेशन्सने 35 षटकांत सहा गडी गमावून 233 धावा केल्या. कदमच्या मनमोहक शतकाच्या जोरावर, जे या वर्षीचे या स्पर्धेतील पहिले होते, बिनिट कम्युनिकेशनने धावफलकावर आव्हानात्मक धावसंख्या उभारली. कदमने 99 चेंडूंत केलेल्या 102 धावांच्या खेळीत 13 चौकार आणि एक षटकार खेचला. बिनिट कम्युनिकेशन्ससाठी सलामीवीर दीपक भोगले याने 46 चेंडूत 49 धावा केल्या, ज्यात आठ चौकारांचा समावेश होता. ऑफ स्पिनर संकेत पांडे डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिस (बी) साठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने तीन विकेट्स पटकावल्या.
प्रत्युत्तरात डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिस (बी) 22.5 षटकात 118 धावांवर बाद झाली. बिनिट कम्युनिकेशनच्या भोगले आणि सिद्धार्थ घुले यांनी प्रत्येकी तीन बळी घेत डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिस (बी) ची फलंदाजी खिळखिळी केली. संकेत पांडे (43 चेंडूत 37 धावा) आणि आदित्य निकम (34 चेंडूत 30 धावा) यांनी कडवी झुंज दिली पण ते आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.
संक्षिप्त धावफलक: बिनिट कम्युनिकेशन 35 षटकात 6 गडी बाद 233 (सुशांत कदम 102; संकेत पांडे 3/45) विजयी वि. डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिस (बी) (संकेत पांडे 37; सिद्धार्थ घुले 3/32)