संगीतकार आणि गायक बप्पी लहिरी यांचं निधन

मुंबई- नवीन वर्ष संगीत क्षेत्रासाठी अनेक दुःखद बातम्याच घेऊन येत आहे. काही दिवसांपूर्वी गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन झाले. लता दीदींनंतर प्रसिद्ध बंगाली गायिका संध्या मुखर्जी यांच्या निधनाची बातमी आली आणि आता बप्पी लहिरी यांनीही जगाचा निरोप घेतला. बप्पी लहिरी यांना मुंबईतील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीला बप्पी दा यांच्या निधनाच्या बातमीवर कोणाचाही विश्वास बसला नाही, पण बप्पी दा यांच्या निधनाची पुष्टी होताच सिनेसृष्टीसह चाहत्यांमध्ये शांतता पसरली.

क्रिटिकेअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. दीपक नामजोशी यांनी पीटीआयला सांगितलं की बप्पी लहिरी यांना नक्की कोणती समस्या होती ज्याने त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टर म्हणाले, ‘बप्पी महिनाभर रुग्णालयात दाखल होते. सोमवारी (१४ फेब्रुवारी) त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र मंगळवारी त्यांची प्रकृती बिघडली. बप्पी दाच्या कुटुंबियांनी डॉक्टरांना घरी बोलावले. बप्पी दा यांना तातडीने रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बप्पी दा यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्या होत्या. OSA मुळे त्यांचा मृत्यू झाला.

बप्पी लहिरी यांनी ८० आणि ९० च्या दशकात खूप दबदबा निर्माण केला होता. ते एकमेव गायक आणि संगीतकार होते ज्यांनी भारतीय चित्रपटाला डिस्को संगीताची ओळख करून दिली आणि ते लोकप्रिय केलं. बप्पी दा यांनी ‘वारदात’, ‘डिस्को डांसर’, ‘नमक हलाल’, ‘डांस डांस’ आणि ‘कमांडो’ यांसारख्या अनेक हिट सिनेमांना संगीत दिले. बप्पी लहिरी यांनीही राजकारणात हात आजमावला होता. २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१४ च्या निवडणुकीत श्रीरामपूर मतदारसंघातून बप्पी दा यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता.