आंबिवली रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीसावर ब्लेडने वार 

कल्याण : मध्य रेल्वेच्या आंबिवली रेल्वे स्थानकात कर्तव्यावर असलेल्या तिकिट तपासणीसाने प्रवाशाकडून तिकीट मागितले म्हणून संतप्त प्रवाशाने मानेवर ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

आंबिवली रेल्वे स्थानकात रेल्वे तिकिट तपासणीस सुनील गुप्ता हे सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास  रेल्वे प्रवाशांची तिकिट तपासणी करीत होते. यावेळी एका रेल्वे प्रवाशाला तिकिट तपासणीसाठी तिकिटाची मागणी केली असता,  त्या अज्ञात रेल्वे प्रवाशाने रेल्वे तिकीट तपासणीस सुनील गुप्ता यांच्या मानेवर ब्लेडने वार करीत प्राणघातक हल्ला करून फरार झाला. या हल्ल्यात सुनील गुप्ता जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ  कल्याणच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल करीत उपचार सुरू करण्यात आले आहेत.