तुमचे दात वेडेवाकडे असल्यामुळे धोका संभवतो !

रुग्णांच्या दंत तपासणीमध्ये एक गोष्ट नेहमीच आढळून येते आणि ती म्हणजे, अयोग्य रीतीने दातांची झालेली वाढ व त्यामुळे बिघडलेली दातांची ठेवण. वेडेवाकडे दात ही समस्या खूपच सर्वसामान्य झाली असून त्यावरचे इलाज लोकांना माहित नसल्याचे आढळून आले आहे. (दंत व्यंगोपन विभाग) Orthodontics ही दंत शास्त्रामधील वेगळी शाखा केवळ वेड्यावाकड्या दातांना दुरुस्त करणे तसेच पुढे आलेले दात आतमध्ये सरकवणे यांसारखी कामे करते.
 
२०१७ मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार १३ – १५ वर्ष वयोगटाच्या मुलामुलींमध्ये १०० पैकी ३३ जणांमध्ये वेडेवाकडे तसेच जास्त पुढे आलेले दात आढळून आले आहेत. २०२० शाळांकडे बघता हे संख्या लाक्षणिकरित्या वाढली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
 
वेड्यावाकड्या दातांमुळे उद्भवणाऱ्या समस्या खालीलप्रमाणे आहेत –
१) सर्व दातांपर्यंत ब्रश न पोहोचणे व त्यामुळे दातांची स्वच्छता न राहणे. 
२) दातांची स्वच्छता न राहिल्या मुळे दातांना कीड लागणे तसेच तोंडाला दुर्गंधी येणे. 
३) कठीण पदार्थ खाल्ल्यानंतर बराच काळ जबडा दुखणे.
४) काही रुग्णांमध्ये शब्द उच्चारांमध्ये देखील फरक झाल्याचे आढळून आले आहे.
५) तोंड उघड बंद करताना कान जवळ येणारा हाडांचा आवाज (TM) PROBLEM) हा देखील अशा प्रकारचा दातांमुळेच उद्भवतो.
६) या सर्व गोष्टींसोबतच माणसांचे दिसणे, त्यांचे हास्य, विशेषतः मुलींच्या हास्यावर होणारा दातांचा परिणाम गंभीर स्वरूपाचा असल्याचे निदर्शनास आले आहे.
 
वेड्यावाकड्या दातांवरील इलाज –
१) अशा प्रकारचे दात कोणत्याही वयात दुरुस्त करता येतात. या इलाजासाठी कोणत्याही प्रकारचे बंधन नाही.
२) दातांच्या दुरुस्ती साठी लागणार कालावधी हा दीड ते दोन वर्षांचा असतो.
३) हा इलाज बारकाईने अभ्यास करून ओर्थोडोंटिस्ट कडूनच करून घेणे गरजेचे आहे.
४) इलाज सुरु असताना डॉक्टरांनीच सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे अगत्याचे ठरते. 
५) हा इलाज जेवढ्या कमी वयात सुरु केला जाईल तेवढाच त्या इलाजास कमी काळ लागतो. 
६) या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास आपण कधीही डॉ. महेश कुलकर्णी यांना संपर्क साधू शकता.
 
वेड्यावाकड्या दातांवरील इलाजाच्या पद्धती –
१) दातांवर बसविण्यात येणाऱ्या तारांच्या मदतीने (BRACES च्या साहाय्याने) या समस्येचा इलाज केला जातो. 
२) त्याच प्रमाणे बिनातारांची ट्रीटमेंट देखील प्लॅस्टिकच्या (INVISALIGN) साहाय्याने आता शक्य झाली आहे. 
३) या ट्रीटमेंट मध्ये कोणत्याही प्रकारचा तारांचा वापर न करता केवळ प्लॅस्टिकट्रेच्या माध्यमातून ट्रीटमेंट केली जाते. 
४) हे प्लास्टिकट्रे १००% पारदर्शक असल्यामुळे, ट्रीटमेंट चालू आहे हे कोणाचाही लक्षात येत नाही.
 
वेड्यावाकड्या दातांसंदर्भात घ्यावयाची दक्षता –
१) ह्या समस्या लक्षात आल्या तरच त्यांचे समाधान करणे शक्य आहे. आणि त्यामुळेच आपण सर्वांनी वेळोवेळी दंत चिकित्सा करून घेणे आवश्यक ठरते.
२) विशेषतः लहान मुलांमध्ये वेड्यावाकड्या दातांची समस्या योग्य वेळी निदर्शनास आल्यास, त्या अधिक गंभीर होण्या आधीच त्यावर इलाज केला जाऊ शकतो. 
 
– डॉ. महेश मधुकर कुलकर्णी
बीडीएस, एमडीएस – ऑर्थोडॉन्टिक्स (सुवर्ण-पदक विजेता) इनव्हिसलाइन प्रॅक्टिशनर
प्रमाणित ओरल इम्प्लांटोलॉजिस्ट
संस्थापक आणि मालक – एमके स्माइल्स डेंटल क्लिनिक, ठाणे (प.).