‘’लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, जसा वळवावा तसा वळतो’’ म्हणूनच त्यास उत्तम आकार देऊन त्याचे जीवन समृद्ध करण्याचे पालक व गुरूंचे काम असते. आई-वडील त्या मुलावर उत्तमोत्तम संस्कार करतात, ज्याप्रमाणे कुंभार चाक फिरवून चिकण मातीच्या गोळ्याला वेगळ्यावेगळ्या प्रकारचे आकार देऊन भांडी बनवून इतरांची गरज भागवून स्वतःचा देखील तो संसार उत्तमरीत्या करू शकतो. अनुभवाचे कुंभाराचे ते कसब असते आणि तीच गोष्ट सुवर्णकाराची – [सोनार], नुसत्या मातीला, दगडाला, लाकडाच्या, ओंडक्याला बाजारात तसा कितीचा असा भाव मिळणार ? पण त्यावर उत्तम संस्कार घडवून त्यावरील उत्तम उत्तम कोरीव काम व आकार दिल्याने [संस्कार] मूळ पदार्थाचे मूळ स्वरूपात बदलून जाते. कसब दाखवून मुळ गोष्टींवर संस्कार करून बाजारात मूळ वस्तूंची किंमत क्वचितच वाढते. इतका संस्काराचा मोठा परिणाम दिसून येतो.
डॉक्टर व गुंडांच्या कार्यातून वास्तविक पाहता दोघेही हाडामांसाचे, विचारांचे, दोन हातापायांचे, स्वतंत्र जीव असतात. दोघांचाही आपला व्यवसाय सांभाळण्यासाठी ते शस्त्रहाती घेत असतात. दोघेही त्यांच्या कामात पारंगत असतात. दोघांनी आपापली कला हस्तगत करण्यासाठी काही कालावधी घालवलेला असतो. दोघांच्याही परिणामांसाठी समोर अन्य जीव असावा लागतो हे जरी खरे असले तरी संस्कार हा घटक दोघांचे व्यक्तिमत्व बदलत असतो. डॉक्टर आपल्या हातातील शस्त्राने रुग्णाचा जीव वाचवितो. शस्त्रक्रिया करून अवयवातील अशुद्ध / खराब भाग काढून टाकतो व रुग्णाचे जीवन वर्धित करून त्यास जीवनदान देत असतो. पण गुंड आपल्या हातातील शस्त्राने चांगल्या व्यक्तीवर हल्ला करून त्याचा निघृणपणे जीव घेतो. एखाद्याचा जीव वाचवणे व जीव घेणे या दोन्ही क्रिया जीवाशी संबंधित असल्या तरी त्याचे परिणाम मात्र टोकाचे आहेत. हे संसाराचे परिणाम आहेत, हेच व्यक्तीचे पूर्ण जीवन बदलून टाकतात उत्तम संस्कारी जीवन जगण्यासाठी निष्ठा, प्रेम, जिव्हाळा, सत्संग, हवा असतो. उत्तम संसारी बनण्यासाठी प्रत्येकाने आज उत्तम संस्कारी बनणे आवश्यक आहे हेच त्याच्या यशाची जीवनाचे इंगित आहे असे म्हंटले तर अजिबात वावगे ठरू नये.