कल्याण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेना आणि यंगस्टर यूथ फाउन्डेशन तर्फे आयोजित हळदीकुंकु कार्यक्रमात प्रभाग क्रमांक 36 बैल बाजार मधील माता आणि भगनीनी शेकडो च्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्य आयोजिका रूपाली भोईर यांनी केले होते. कार्यक्रमात शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख विजया पोटे यांनी उपस्थित राहून आपलं आशीर्वचन दिले. मनसेच्या नैना भोईर, माजी नगरसेविका मीनाक्षी डोईफोडे, रुक्मिणी सोनी, गायत्री म्हाले , जयश्री मगर, समाजसेविका सुनीता अडसूळ आदींचा सत्कार करण्यात आले. सालाबाद प्रमाणे आयोजित ह्या हळदीकुंकु समारंभात हया वर्षी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ची महिला उप विभाग प्रमुख रंजना सांगळे, महिला शाखा प्रमुख राजश्री डेरे, उप शाखा प्रमुख विद्या लोटलीकर , महिला आघाडी रत्ना बागवे, मंदा सानप, आरती बागवे आणि सुनंदा गावडे आदींनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम सफल केला.