ठाणे : नवी मुंबईतील पाम बीच रोड प्रकल्पाच्या प्रलंबित झालेल्या घणसोली ते ऐरोली या भागाला अखेर मंजुरी देण्यात आली असून, या प्रकल्पासाठी निविदाही मागवण्यात आल्या आहेत. सुमारे येत्या अडीच वर्षांत हा रस्ता पूर्णपणे तयार होणार आहे.
हा रस्ता ऐरोली-मुलुंड खाडी पुलाला जोडणार आहे आणि वाहन चालकांनाही पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणार आहे. या व्यतिरिक्त ठाणे-बेलापूर रस्त्यावरील गर्दी कमी होईल. दररोज या मार्गावर सकाळपासून ते रात्रीपर्यंत वाहनांची गर्दी असल्यामुळे वेळेचा अपव्याय आणि इंधनाचीही नासडी होत असते.
या प्रकल्पासाठी तब्बल ५४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आणि हा प्रकल्प सुमारे अडीच वर्षांच्या आत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. हा रस्ता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रस्तावित प्रादेशिक ‘कनेक्टिव्हिटी’चा एक भाग आहे. या मार्गाचा जलद पर्याय, ऐरोली-काटई मार्गाने अनेक शहरांमध्ये प्रवेश या ‘कनेक्टिव्हिटी‘मुळे होणार आहे. पाम बीच रोड प्रकल्पाचा घणसोली ते ऐरोली विभाग आणि खाडीच्या खारफुटीचे क्षेत्र ओलांडण्यासाठी परवानगी नसल्यामुळे वषार्नुवर्षे रखडलेला हा भाग अखेर उघडला आहे. कारण प्रकल्पासाठी निविदा मागवल्या आहेत.
हा रस्ता ऐरोली-मुलुंड खाडी पुलालादेखील जोडेल. ज्यामुळे शहरांच्या वाहतुकीच्या गरजांसाठी तो अधिक महत्त्वाचा ठरेल. या प्रकल्पाची किंमत ५४० कोटी असण्याचा अंदाज आहे. त्यातील अर्धा हिस्सा शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) द्वारे वाटून घेतला जाईल.
‘हा प्रकल्प नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रस्तावित प्रादेशिक ‘कनेक्टिव्हिटी’चा एक भाग आहे. “मुंबई महानगर प्रदेशासाठी सर्वसमावेशक वाहतूक सध्याच्या अभासानुसार ही कनेक्टिव्हिटी ठाणे ते सानपाडा या कोस्टल रोडचा एक भाग आहे, अशी माहिती सिडकोच्या अधिका-याने दिली.