अंबरनाथ: नदीमध्ये पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोन जण बुडून मृत्युमुखी पावल्याची घटना बदलापूरजवळ बारवी नदीमध्ये घडली.
बदलापूर येथे राहणारे सिद्धेश सावंत (18) आणि बाळकृष्ण केदारे (36) अशी बुडून मरण पावलेल्यांची नावे आहेत. सिद्धेश सावंत आणि निशिकांत मोरे हे दोघे रविवार 14 मे रोजी बदलापूरजवळील अस्नोली येथे बारवी नदीमध्ये पोहोण्यासाठी आले होते. पोहोताना सिद्धेश सावंत याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही, तो पाण्यात बुडू लागला. यावेळी तेथे असणारे बाळकृष्ण केदारे हे सिद्धेश सावंत याला वाचवण्यासाठी गेले. त्यांनाही पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने केदारे यांचाही पाण्यात बुडल्याने मृत्यू झाला.
स्थानिकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. कुळगाव पोलिसांत याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.