एनएमएमटी बसेसमध्ये फोनपेचा जास्तीत जास्त वापर

कॅशलेस तिकीट वितरीत केल्याबद्दल वाहकांचा सत्कार

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून प्रवास करतांना प्रवाशांनी तिकीट काढण्यासाठी रोख रक्कम देण्याऐवजी कॅशलेस व्यवहारासाठी फोन-पे, क्युआर कोड स्कॅनिंग तसेच एनएमएमटी बस ट्रॅकर ॲपद्वारे तिकीट बुकींग व ऑनलाईन बसपास यांच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंटची सुविधा देण्यात आली आहे.

त्याअनुषंगाने परिवहन उपक्रमाच्या प्रवाशांकडून जास्तीत जास्त फोन-पे ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीने कॅशलेस तिकीट विक्रीची रक्कम स्विकारुन सदरची रक्कम जमा करणाऱ्या वाहकांचा नवी मुंबई महानगरपालिका परिवहन मुख्यालय, सिबीडी-बेलापूर येथे 16 फेब्रुवारी 2023 रोजी परिवहन व्यवस्थापकांच्या हस्ते गुणगौरव आणि सत्कार करण्यात आला आहे. कॅशलेस पेमेंट पद्धतीचा वापर जास्तीत जास्त करावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत प्रवाशांना करण्यात येत आहे.