कळवा, मुंब्रा, दिव्यातील बेकायदा बांधकामे रडारवर

कारवाईसाठी ज्यादा पोलिसांची कुमक मागवली

ठाणे : ठाणे शहरातील अनधिकृ त बांधकामे महापालिका प्रशासनाच्या रडारवर आली असून बांधकामाच्या विरोधात कारवाई करताना कोणत्याही प्रकारची अनुचित
घटना घडू नये यासाठी दप्पट पोलीस बंदोबस् ु ताची मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी काल सर्वसहाय्यक आयुक्तांची बैठक घेऊन शहरातील अनधिकृ त बांधकामाच्या विरोधात तसेच फे रीवाल्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मुंब्रा, दिवा आणि कळवा या प्रभाग समिती क्षेत्रात सर्वात जास्त अनधिकृ त बांधकामे सुरू आहेत. दिवा आणि मुंब्रा परिसरात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिका पथकावर यापूर्वी दगडफे क तसेच अधिकारी कर्मचारी याच्यावर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या होत्या, त्यामुळे पुढच्या आठवड्यात होणाऱ्या कारवाईकरिता पोलिसांची ज्यादा कु मुक महापालिका प्रशासनाने मागितली आहे. ही मोहीम काही आठवडे चालणार आहे त्यामुळे
महापालिके च्या सवे ेत असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त पोलीस कु मक मागविण्यात आली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मुंब्रा, दिवा आणि कळवा या भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृ त बांधकामे सुरू आहेत. खारफु टीची झाडे तोडून बांधकामे के ली जात आहेत. घोडबंदर रोड भागात देखिल आदिवासींच्या तसेच शासकीय जमिनीवर भूमाफियांनी बिनधास्त बांधकामे सुरू के ली आहेत. येऊर हे निसर्गरम्य ठिकाण आहे. इको सेन्सेटिव्ही झोन आहे. असे
असतानाही या भागात अनधिकृ त बंगले, हॉटेल आणि ढाबे उभारण्यात आले आहेत. येथील बांधकामावं र यापूर्वी मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली होती, परंतु पुन्हा अनधिकृ त बांधकामे बांधण्याससरुवात झाली असून त्याच्या विरोधात देखिल कारवाई होण्याची शक्यता आहे.