ठाणे: जिल्ह्यात आज पुन्हा एकदा फक्त एका नवीन कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. शहरात एकही रूग्ण सापडला नाही.
कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरात फक्त एक रूग्ण मिळाला आहे. जिल्ह्यातील इतर महापालिका, नगरपालिका आणि ठाणे ग्रामिण भागात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.
जिल्ह्यात आत्तापर्यंत सात लाख ४७,३७३ रूग्ण बाधित सापडले आहेत. तर रुग्णालयात आणि घरी २९जणांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत सात लाख ३६,१४६ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत २,९६८ रूग्ण दगावले आहेत.