ठाणे : जिल्ह्यातील नवीन कोरोना रूग्णवाढ मंदावली असून आज अवघे तीन रूग्ण सापडले आहेत. ठाणे शहरात सलग दोन दिवस एक रूग्ण मिळाला आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दोन तर ठाण्यात एक असे तीन रूग्ण सापडले आहेत. अन्य ठिकाणी एकही रूग्ण मिळाला नाही. जिल्ह्यात आत्तापर्यंत सात लाख ४७,३६८जण बाधित सापडले आहेत तर रुग्णालयात आणि घरी अवघे ३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आत्तापर्यंत सात लाख ३६,१२२जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर आत्तापर्यंत २,९६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.