ठाणे : ठाणे शहरातील नवीन कोरोना रूग्ण किंचित वाढले आहेत तर जिल्ह्यात १६७ जणांची भर पडली आहे. आज एक रूग्ण दगावला आहे.
नवी मुंबई महापालिका हद्दीत ७२, कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात १५, मीरा-भाईंदर येथे २७ ,भिवंडी महापालिकेमध्ये तीन आणि उल्हासनगर महापालिका भागात दोन रूग्ण सापडले आहेत. ठाणे ग्रामीण परिसरात चार रूग्ण नोंदवले आहेत.
जिल्ह्यात आत्तापर्यंत सात लाख ३४,९४४जण बाधित सापडले आहेत तर विविध रुग्णालयात आणि घरी ८६५जणांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत सात लाख २२,९१२ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आज एक रूग्ण दगावला असून आत्तापर्यंत ११,९३१जणांचा मृत्यू झाला आहे.