जिल्ह्यात वाढतोय हत्तीरोगाचा प्रादुर्भाव

जिल्ह्यात २२५ रूग्ण
सर्वाधिक रूग्ण ठाणे-भाईंदर पालिका हद्दीत
भिवंडीत सर्वाधिक बालक संक्रमित

ठाणे : गेल्या काही महिन्यांपासून ठाणे जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव वाढत असून मार्च २०२२ अखेर जिल्ह्यात एकूण २२५ रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी ८४ रूग्ण हे ठाणे पालिकेच्या हद्दीतील तर ४३ रूग्ण भाईंदर पालिका परिसरात आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने सावधानतेचा इशारा देत भिवंडीमध्ये हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम राबविली आहे.

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या संक्रमण पडताळणी सर्वेक्षणात भिवंडी तालुक्यात ६ ते ७ वयोगटातील सर्वाधिक २३ बालकांना हत्तीरोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे समोर आले आहे. वर्षभरापूर्वी म्हणजेच ऑक्टोबर २०२१ मध्ये सहा ते सात वर्ष वयोगटातील निवडक मुलांची तपासणी करण्यात आली. त्यात ठाणे जिल्ह्यातील ४३ लहान मुलांच्या रक्तात हत्तीरोगाचे सुक्ष्मजीव आढळले असून त्यात भिवंडी तालुक्यातील सर्वाधिक २३ बालके आहेत. त्याअनुषंगाने ठाणे येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्रात भिवंडी तालुक्यातील वैद्यकिय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक यांचे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. बालकांना हत्तीरोग मुक्त ठेवण्यासाठी मुले, प्रौढ व्यक्ती व वयोवृद्ध आदींना हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळयांचे सेवन करणे आवश्यक आहे.

अशी आहे रूग्णसंख्या तालुकानिहाय

मार्च अखेर शहापूरमध्ये ९, मुरबाड ९, कल्याण ग्रामीण ७, कल्याण मनपा १०, भाईंदर मनपा ४३, ठाणे पालिका ८४, उल्हासनगर ९, बदलापूर -वांगणी ५, अं बरनाथ नगरपालिका ६, भिवंडी मनपा १७, भिवंडी ग्रामीण २६ असे एकू ण २२५ रूग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे मनपा परिसरात सर्वाधिक रूग्ण असले तरी भिवंडी तालुक्यात सर्वाधिक लहान बालकांचा समावेश आहे. म्हणून भिवंडी तालुक्यात सामुदायिक
औषधोपचार मोहीम राबविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. महेश नगरे यांनी दिली.

हत्तीरोगाची कारणे

हत्तीरोग हा क्युलेक्स प्रजातीच्या डासांमार्फत होतो. सेप्टिक टँक, घाण/ निचऱ्याच्या जागी व गटारे अशा दषिु त पाण्याच्या जागी या डासांची पैदास होते.

हत्तीरोगाची लक्षणे

हाता/पायाला सुज किं वा हत्तीपायसारख्या विकृ ती, डास चावल्यानंतर/सुक्ष्मजीव शरीरात प्रवेश झाल्यानंतर पाच ते दहा वर्षांनतर निर्माण होत असल्याने सुरुवातीच्या
काळात व्यक्ती/रुग्ण याबाबत अनभिज्ञ राहतात.

क्युलेक्स प्रजातीच्या डासांच्या नियंत्रणाकरीता उपाययोजना

डास नियंत्रणाकरीता शौचाच्या भांड्यामार्फत सेप्टिक टँकमध्ये जळके ऑईल सोडणे, वेंट पाईपला जाळ्या बसविणे, घराबाहेर निचऱ्याचे पाणी साठुन न राहण्याकरीता “शोष खड्डे” तयार करणे व गटारांचे पाणी साचु न देता वाहते ठे ऊन तेथे डासनियंत्रणासाठी किटकनाशक/गप्पी माशांचा वापर करणे यासारख्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.