ओबीसी आरक्षण : राष्ट्रवादीने केला जल्लोष

ठाणे : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. हे आरक्षण तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांठिया आयोगामुळेच हे आरक्षण मिळाले असल्याचा दावा करीत डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या वतीने पक्ष कार्यालयासमोर जल्लोष साजरा केला.

ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केलेल्या प्रयत्नांना यामुळे मोठे यश आले आहे, असे नमूद करीत ओबीसी सेलचे शहराध्यक्ष गजानन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा सुजाता घाग यांच्या उपस्थितीत फटाके फोडून, ढोलताशांचा गजरात जल्लोष करण्यात आला.

यावेळी परिवहन समिती सदस्य नितीन पाटील, राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.