भावना जेव्हा संपतात तेव्हा…..

शिवसेनेतील खळबळजनक बंडानंतर सेना नेतृत्वाकडून सुरुवातीला सावध आणि संयत प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. बंडखोरांना ‘या चिमण्यांनो परत फिरा’ या चालीवर साद घालण्यात आली. त्यास म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही हे लक्षात येताच नेत्यांची भाषा कठोर होत गेली. नेत्यांचा जसा तोल ढळू लागला तसे कार्यकर्तेही बंडखोरांविरुद्ध आक्रमक होऊ लागले. फु टीर आमदारांच्या घरांवर, कार्यालयांवर हल्ले होऊ लागले तर रस्त्यावर उतरून निदर्शने. या बदलत्या पार्भूमश्व ीवर साहजिकच बंडखोर आमदार बिथरू लागले आणि सेना नेत्यांच्या भावनिक आवाहनाकडे संशयाने पाहू लागले. संशयाचे ढग दाटू लागले आणि आवाहनाची धार बोथट होऊ लागली. जो पक्ष सातत्याने भावनांच्या हिंदोळ्यावर झुलत आला त्याने राजकीय डावपेचाचे झोपाळे पसंत के ले. या झोपाळ्यावर पडण्याची भीती वाटेनाशी झाली
तर मात्र सेनेला मोठ्या बाका प्रसंगाला सामोरे जावे लागणार आहे.

शिवसेना आणि बंडखोर गटाने भावनांना सोडचिठ्ठी दिल्याचे आता स्पष्ट झाले आहे. उभयतांमध् बर ये ीच कटूता निर्माण झाली असून परतीचे दोर कापले गेले आहेत असे एकू ण चित्र आहे. फु टीर गटातील सर्व मंत्र्यांची खाती काढून घेतल्यामुळे आता आर या पार या निर्णयापर्यंत दोन्ही गट आलेले दिसतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब
ठाकरे हे आपले दैवत आहे, उद्धव ठाकरे हेच आमचे नेते आहेत, आम्ही काल शिवसैनिक होतो आणि उद्याही राहणार असा पवित्राही बंडखोर घेत असल्याने भावनेला
मुत्सद्दी राजकारणाचा लेप त्यांनी चढवलेला दिसतो. हा लेप पुढच्या दहा-बारा दिवसात टिकू न राहतो काय हा खरा प्रश्न आहे. न्यायालयाच्या निकालाने श्री. एकनाथ शिंदे गटाला दिलासा दिला असल्याचे बोलले जात असले तर प्रत्यक्षात त्यांना समर्थन देणाऱ्या आमदारांचा निर्धार तुटणार नाही याची काळजीही त्यांना घ्यावी लागणार आहे.

विश्वासदर्शक ठराव संमत करून घेणे किं वा बहुमत सिद्ध करणे या सत्च्ते या मार्गातील तांत्रिक बाबींवर लक्ष केंद्रित झाल्यामुळे शिवसेनेतील भावना कालबाह्य झाल्या काय असा प्रश्न परिस्थिती पाहून मनात येतो. अन्य राजकीय पक्ष आणि शिवसेना यांच्यातील मूलभूत फरक आता पुसला गेला असून सत्तेच्या वारीत कोणाच्याच खांद्यावर भावनेची पताका दिसत नाही !