ठाण्यात कोरोनाचे आठ नवीन रुग्ण

ठाणे: शहरातील नवीन कोरोना वाढ कमी झाली आहे. आज आठ रुग्णांची भर पडली तर जिल्ह्यात १२ रूग्ण वाढले आहेत.

ठाणे महापालिका हद्दीत आठ तर नवी मुंबई येथे चार रूग्ण असे १२जण जिल्ह्यात वाढले आहेत. उर्वरित महापालिका, नगरपालिका आणि ठाणे ग्रामिण परिसरात एकही नवीन रूग्ण सापडला नाही.

जिल्ह्यात आत्तापर्यंत सात लाख ९,३८० रूग्ण बाधित सापडले आहेत तर घरी १५७ जणांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत सहा लाख ९७,२७७ ठाणेकर ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत ११,८९५ रूग्ण दगावले आहेत.