‘स्वामी फाऊंडेशन’ चे संस्थापक महेश कदम यांनी मल्हार टॉकीज इथे आयोजित केलेल्या धर्मवीर सिनेमाच्या शो च्या वेळी राहणार उपस्थित.
१३ मे ही तारीख समस्त ठाणेकरांसाठी एखादा सण बनली आहे. संपूर्ण ठाण्याच्या आसमंतात फक्त ‘आनंद’ आहे, कारण ठाण्याचं लाडकं व्यक्तिमत्व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. अनेकांच्या घरच्या देव घरात ज्यांची तसबीर पुजली जायची अशा धर्मवीरांना पुन्हा अनुभवण्यासाठी आता सर्व ठाणेकर सज्ज झाले आहेत. ठाण्यात जागोजागी बॅनर, फ्लेक्स, मोठ मोठाले कट आउट्स, होर्डिंग्ज लागले आहेत. सर्वांना आता फक्त या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.
‘स्वामी फाऊंडेशन’चे संस्थापक महेश कदम यांनी तर ठाण्यातील मल्हार टॉकीज इथे मोफत शोचे आयोजन केले आहे. ‘धर्मवीर’च्या पहिल्या शो साठी कालिचरण महाराज स्वतः ठाण्यात येणार आहेत. त्याच बरोबर श्री. ‘शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान’ चे संस्थापक नितीन चौगुले हे देखील या शो साठी उपस्थित असणार आहेत.
तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या मृत्यूनंतर जेव्हा सिंघानीया हॉस्पिटल पेटवलं गेलं त्यावेळी ज्या आनंद भक्तांना अटक केली गेली ते सर्वजण देखील या शो ला उपस्थित राहणार आहेत.