ठाणे : शहरातील नवीन कोरोना रुग्णांचा आकडा वाढला असून आज आठ नवीन रुग्णांची भर पडली तर जिल्ह्यात १३ रूग्ण वाढले आहेत. महापालिका हद्दीतील माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात चार, वर्तकनगर प्रभाग समिती भागात तीन आणि नौपाडा-कोपरी प्रभाग समिती येथे एक नवीन रूग्ण सापडला आहे.
नवी मुंबई महापालिका हद्दीत पाच रुग्णांची नोंद झाली आहे. उर्वरित महापालिका, नगरपालिका आणि ठाणे ग्रामिण परीसरात एकही रूग्ण नोंदवला गेला नाही.
जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि घरी ४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत सहा लाख ९६,९४४जण रोगमुक्त झाले आहेत तर सात लाख ८,९१३जण आत्तापर्यंत बाधित सापडले आहेत तर ११,८८९जणांचा मृत्यू झाला आहे.