ठाणे : शहरातील नवीन कोरोना रुग्णांची किंचित वाढ झाली आहे. आज ३९ रुग्णांची भर पडली तर जिल्ह्यात १७४ रूग्ण सापडले आहेत.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ७१, कल्याण-डोंबिवली महापालिका येथे १०, मीरा-भाईंदरमध्ये ३१, उल्हासनगर परिसरात सात आणि भिवंडी महापालिका भागात चार रूग्ण वाढले आहेत. बदलापूरमध्ये एक आणि ग्रामिण परिसरात ११ रुग्णांची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि घरी ८०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत सात लाख ३४,७७७जण बाधित सापडले आहेत. तर आत्तापर्यंत सात लाख २२,५४८ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत ११,९३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.