ठाणे: टीजेएसबी सहकारी बँकेच्या १३९व्या आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ऍटोमॅटिक रूट या प्रणालीनुसार पहिल्या शाखेचे उदघाटन पर्वरी गोवा येथे हाऊस क्रमांक ६८६, बा. भ. बोरकर मार्ग, साल्वाडोर डो मोंडो, मारुती सुझुकीच्या जवळ येथे सव्वीस मार्च रोजी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांच्या हस्ते झाले. यावेळी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्बलक्ष्मी शिराळी तसेच बँकेचे संचालक उपस्थित होते.
यावेळी बोलताना बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी बँकेच्या त्रेपन्न वर्षाच्या प्रगतीचा आढावा घेतला. बँकेचे संस्थापक आणि माजी संचालक यांनी जपलेली सहकाराची मूल्य, आर्थिक शिस्त, व्यावसायिक धोरण यामुळे बँकेचा विस्तार झाल्याचे नमूद केले. बँकेची ग्राहक केंद्रित कार्यप्रणाली आणि अंमलबाजवणी यामुळे बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे अध्यक्ष शरद गांगल यांनी यावेळी सांगितले. बँक भागधारकांना दरवर्षी नियमितपणे १५ टक्के लाभांश देत असल्याने बँकेच्या ठेवीदारांमध्ये एक मोठा विश्वास निर्माण झालेला आहे. उद्याचे बँकिंग तंत्रज्ञान आणि प्रतिभा या दोन मुख्य बाबींच्या आधारे होईल. यासाठी टीजेएसबी सहकारी बँक सज्ज आहे. तंत्रज्ञानयुक्त, परिपूर्ण बँकिंग सेवेच्या आधारे बँक कार्यरत आहे.
बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्बलक्ष्मी शिराळी यांनी आपल्या भाषणात गोव्याचे विशेष आभार मानले. बँकेची व्यावसायिक वृद्धी गोव्याच्या पाठिंब्यामुळे होत असल्याचे सांगितले. गोवा शासनाचा बँकेच्या डिजिटल व्यवसाय विस्तारात उल्लेखनीय सहभाग असल्याचे नमूद केले.
बँकेचे क्षेत्रीय प्रमुख अरुण भट यांनी टीजेएसबी सहकारी बँक आणि गोवा याचे नाते सांगितले. बँकेने आपली पहिली महाराष्ट्र राज्याबाहेरील शाखा गोवा येथे सुरु केली आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ऍटोमॅटिक रूट या प्रणालीनुसार पहिली शाखा ही गोवा येथेच सुरु केल्याचे अरुण भट म्हणाले.
एकशे एकूण चाळीसाव्या पर्वरी शाखा व्यवस्थापक स्यामा नाईक यांनी उदघाटन कार्यक्रमासाठी आलेले सर्व उपस्थित, शासकीय यंत्रणा, विद्या प्रबोधिनी आणि राजेंद्र बोभे यांचे आभार मानले