जिल्हा

ठाण्यातून हरवलेला रुग्ण केरळात सापडला

ठाण्यातून हरवलेला रुग्ण केरळात सापडला
ठाण्यातून हरवलेला रुग्ण केरळात सापडला फोटो: ठाणे वैभव
न्यायाधीशांच्या तत्परतेने मिळाले कुटुंब 

ठाणे: ठाण्यातून बेपत्ता झालेल्या रुग्णाला न्यायाधीशाच्या तत्परतेने पुन्हा कुटुंबात जाता आले आहे. बोलता न येणारा आजारी अवस्थेतील हा रुग्ण ठाण्यातून केरळात गेला होता. मात्र तेथील समाजसेवकाने दिलेल्या माहितीनुसार ठाण्यातील एक न्यायधीशांनी तत्परता दाखवल्याने पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करत रुग्णास ताब्यात घेऊन कुटुंबाच्या ताब्यात दिले.

ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे विपीन चतुर्वेदी हे अर्धांग वायूच्या आजाराने त्रस्त आहेत. शिवाय त्यांना बोलताही येत नाही. 24 सप्टेंबर रोजी ते घरातून बेपत्ता झाले होते. त्या संदर्भात कापूरवाडी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांकडून याचा शोध घेण्याचे काम सुरू असतानाच 26 सप्टेंबर रोजी विपिन केरळ राज्यातील कोझिकोड जिल्ह्यातील 'कुट्टियाडी न्यू बस स्टँड' वर बसला होता. त्याची अवस्था पाहून एसटी स्टँडवर आलेल्या एका समाजसेवकाने ठाणे सत्र न्यायालयातील न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रवींद्र पाजणकर यांच्याशी संपर्क साधला आणि बस स्टँडवर आढळलेली व्यक्ती ठाण्यातील असल्याचे खाणाखुणावरून समजले असून त्यांना त्यांच्या कुटुंब शोधून देण्यास मदत करावी अशी विनंती केली. त्याचा फोटोही पाठवून दिला. लागलीच न्यायाधीश पाजणकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून ही माहिती देऊन व्यक्तीच्या कुटुंबाचा तत्काळ शोध घेण्यास सांगितले.

संबंधित ठाणे आयुक्तालयात विचारणा केली असता सदर व्यक्ती कापुरबावाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता असल्याचे समजले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक महेश चव्हाण यांनी पथकासोबत केरळला जाऊन विपीन यांना ताब्यात घेतले आणि ठाण्यात येऊन (ता.29) त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले. न्यायाधीशांच्या तत्परतेमुळे ठाण्यातून बेपत्ता झालेल्या विपिनला पुन्हा त्याच्या कुटुंबात सुखरूपणे परतता आले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475