जिल्हा

३० ऑगस्टला ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन

३० ऑगस्टला ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन
३० ऑगस्टला ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या वतीने 32 वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रविवार 30 ऑगस्ट 2026 रोजी होणार असल्याची घोषणा आज झालेल्या बैठकीत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली. सात वर्षानी ही ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत असून या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी, नागरिकांनी सहभागी आवाहन असे महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनची बैठक महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे (शरद पवार गट) अभ‍िजीत पवार, महापालिका आयुक्त सौरभ राव, नगरसेवक योगेश जानकर, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महापालिकेचे उपायुक्त, सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता व क्रीडा विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या सहकार्याने पार पडणार असून आज झालेल्या बैठकीत ठाणे महापालिका अधिकारी, वाहतूक विभाग, पोलीस विभाग व संबंधित विभागांना सोपविण्यात आलेली जबाबदारी योग्य रितीने पार पडावी अशा सूचना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी बैठकीत दिल्या. ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धा मार्गाची पाहणी करुन आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याच्या दुरूस्तीची कामे पूर्ण करुन घ्यावीत. स्पर्धा मार्ग हा स्पर्धकांसाठी अडथळ्याचा ठरणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. तसेच स्पर्धेच्या दिवशी वाहतूकीचे योग्य पध्दतीने नियोजन करावे, शाळा- महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होतील हे पहावे. तसेच महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी परिवहनच्या बसेस उपलब्ध करुन विद्यार्थ्यांची आवश्यक ती काळजी घ्यावी या दृष्टीने नियोजन करावे. स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्‌या सर्व परवानग्या घेण्याच्या सूचनाही आयुक्त सौरभ राव यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ही शहराची मॅरेथॉन असून या स्पर्धेत डॉक्टर्स, वकील, सिनेकलाकार, माजी लोकप्रतिनिधी, महापालिकेचे माजी अधिकारी अशा विविध क्षेत्रातील नागरिकांना सहभागी करुन घेतले जाणार आहे. यासाठी या स्पर्धेची माहिती सर्व स्तरांमध्ये पोहचण्याच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 32 व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत विविध गट असतील. राज्यस्तरीय गटामध्ये खुला गट (महिला व पुरुष)- 21 किमी, 18 वर्षावरील (महिला व पुरुष)- 10 किमी, 18 वर्षाखालील (मुले व मुली)- 10 किमी असे विभाग आहेत. तर, जिल्हास्तरीय गटात 15 वर्षाखालील (मुले व मुली)- पाच किमी, 12 वर्षाखालील (मुले व मुली)- तीन किमी, ज्येष्ठ नागरिक (पुरुष आणि महिला) - 500 मीटर या गटांचा समावेश असल्याची माहिती उपायुक्त मीनल पालांडे यांनी बैठकीत दिली.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600