जिल्हा

नौपाड्यातील व्यापाऱ्यांकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हात

नौपाड्यातील व्यापाऱ्यांकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हात
नौपाड्यातील व्यापाऱ्यांकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हात फोटो: ठाणे वैभव
आमदार संजय केळकर यांच्या हस्ते गोखले रोडवर शॉपिंग फेस्टिव्हलचा शुभारंभ

ठाणे: एकीकडे दिवाळीची जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवर आर्थिक संकट चालून आले आहे.  ठाण्यातील नौपाडा व्यापारी मंडळाने सामाजिक भान जपत या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला चार लाख एक हजार रुपयांचा धनादेश दिला. आमदार संजय केळकर यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी श्री.केळकर यांच्या हस्ते गोखले रोडवर शॉपिंग फेस्टिव्हलचा शुभारंभही करण्यात आला.

नौपाडा व्यापारी मंडळाच्या वतीने आयोजित नौपाडा शॉपिंग फेस्टिव्हल २०२६ चा शुभारंभ शनिवारी, १७ ऑक्टोबर रोजी गोखले रोडवर आमदार संजय केळकर यांच्या हस्ते उत्साहात झाला. संपूर्ण गोखले रोड आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आला असून लहान मुलांना आकर्षित करणारे विविध वेशभूषेतील कार्टुन्सची चलचित्रे ग्राहकांचे लक्ष वेधुन घेत होती.

ठाणेकरांच्या खरेदीचे प्रमुख केंद्र असलेल्या गोखले रोड परिसरात इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, सोने-चांदी आणि वाहन खरेदीसाठी ग्राहकांची मोठी पसंती असते. यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून विविध सवलती आणि नव्या वस्तूंचे पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सोन्या-चांदीच्या घडणावळीवर विशेष सूट तसेच अन्य खरेदीवरही आकर्षक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.

बाजारपेठेतील व्यापार वृद्धीसोबतच दुष्काळाप्रती संवेदनशीलता जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. नौपाडा व्यापारी मंडळाचे अध्यक्ष मितेश शहा यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475