मुंबई : मुंबईकरांना आता बस, लोकल आणि मेट्रोसाठी वेगवेगळे कार्ड काढण्याची आवश्यकता नाही. कारण आता तिन्ही वाहतुकींसाठी एकच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएससी कार्ड) जारी करण्यात आलं आहे. याचेच लोकार्पण आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, मुंबई महानगर पालिकेचे प्रशासक आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ”मेट्रोच्या एका मार्गाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले होते. आज बेस्टच्या नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्डचे उद्घाटन होत आहे. या दोन्ही गोष्टी अभिमान वाटाव्यात अशा आहेत.” ते म्हणाले, ”आपण मुंबईकर असल्याने येथील परिवहन सेवेतून आपला प्रवास झाला आहे. शाळेत जाण्यासाठी आणि येण्यासाठी बसमधून प्रवास झाला आहे. मात्र आता काळ बदलला असून आता बसच्या प्रवासात अनेक बदल झाले आहेत.