कल्याणात शरद पवार यांचे जंगी स्वागत

कल्याण : कल्याणात शरद पवार यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर प्रथमच उल्हासनगर येथे एल्गार परिषदेसाठी पवार कल्याण पश्चिमेत बिर्ला स्कूल मैदानावर हँलीकॉप्टरने प्रवास करून दाखल झाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या कल्याण शहरी ग्रामीण कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहात घोषणाबाजी करीत आम्ही आपल्या पाठाशी खंबीरपणे उभे असल्याचे दाखवत परिसर दुमदुमून टाकला. कार्यकर्त्यांनी केलेली प्रचंड गर्दी या निमित्ताने बरेच काही सांगून जात असल्याचे चित्र या निमित्ताने दिसत होते.